Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Pune News : पुणे GCC क्षेत्रात वेगाने पुढे जात असून सध्या शहरात 130 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स कार्यरत आहेत. आगामी एका वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक करण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  • By विवेक
Updated On: Sep 04, 2026 | 06:57 PM
पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Follow Us
Follow Us:
  • पुण्यात सध्या 130 पेक्षा अधिक GCC कार्यरत
  • एका वर्षात GCC ची संख्या 800 पार करण्याचा फडणवीसांचा विश्वास
  • मॅग्नमच्या केंद्रातून एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी
 

Pune News : ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स अर्थात GCC क्षेत्रात पुण्याची वाटचाल वेगाने सुरू आहे. जागतिक कंपन्यांसाठी व्यवसाय सेवा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुणे महत्त्वाचे केंद्र बनत असून, शहरात आतापर्यंत 130 पेक्षा अधिक GCC कार्यरत झाले आहेत. आगामी एका वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. GCC क्षेत्रात पुण्याने देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवावे, हे राज्य सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगपूरक वातावरणामुळे पुण्याला पसंती

महाराष्ट्र हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी देशातील प्रमुख गुंतवणूक केंद्र बनत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात जागतिक कंपन्यांकडून ग्लोबल बिझनेस सर्व्हिस सेंटर्स सुरू करण्याला मिळणारा प्रतिसाद हा शहरातील उद्योगपूरक वातावरण आणि उपलब्ध कुशल मनुष्यबळाची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.

Pratap Sarnaik: प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या नियमबाह्य रिक्षांवर कारवाईचा बडगा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

पुण्याची ओळख आधीपासूनच शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून आहे. आता GCC क्षेत्राच्या माध्यमातून जागतिक कंपन्यांच्या व्यवसायातील महत्त्वाच्या प्रक्रिया आणि सेवा पुण्यातून हाताळल्या जात आहेत.

मॅग्नमच्या केंद्रातून रोजगारनिर्मिती

मॅग्नम आईस्क्रीम कंपनीने पुण्यात सुरू केलेले ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटर हे या वाढत्या गुंतवणुकीचे आणखी एक उदाहरण ठरत आहे. या केंद्रामुळे एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पायाभूत सुविधा अन् नागरी सेवांच्या बळकटीकरणाला वेग; पिंपरी-चिंचवडच्या स्थायी समितीत विविध विकासकामांना मंजुरी

या केंद्राच्या माध्यमातून कंपनीच्या जागतिक व्यवसायाशी संबंधित विविध सेवा आणि प्रक्रिया पुण्यातून हाताळल्या जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कुशल मनुष्यबळासाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबळगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, मॅग्नमचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Pune global capability centres gcc hub devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
1

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
2

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन
3

Delhi Politics: दिल्लीच्या राजकारणात मोठा भुकंप…; देवेंद्र फडणवीसांना उपपंतप्रधान बनवण्याचा RSS चा प्लॅन

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान
4

Devendra Fadnavis on Delhi Politics: दिल्लीतील फेऱ्या अन् केंद्रीय राजकारणाच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.