Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, संशोधन संस्था, वाहन उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक पट्टे, नवउद्योजकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहनांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे पुण्याच्या ओळखीत आणखी एक भर पडत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 14, 2026 | 05:05 PM
‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

Follow Us
Follow Us:

सुनयना सोनवणे/ पुणे : एकेकाळी पुणे म्हटले की शिक्षण, साहित्य, कला-संस्कृती आणि विद्यापीठांचे शहर अशी ओळख समोर यायची. पुढे माहिती-तंत्रज्ञान उद्योगाच्या विस्तारामुळे पुण्याची ओळख ‘आयटी हब’ म्हणून झाली. आता अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, संशोधन संस्था, वाहन उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या, औद्योगिक पट्टे, नवउद्योजकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहनांसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे पुण्याच्या ओळखीत आणखी एक भर पडत आहे. शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा हा प्रवास पुण्याला ‘अभियंत्यांचे शहर’ अशी नवी ओळख देत आहे.

 

महाराष्ट्राच्या २०२५-२६ च्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत राज्यातील ३८० अभियांत्रिकी संस्थांचा समावेश होता. पुण्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा विस्तारही पारंपरिक शाखांपासून नव्या तंत्रज्ञानाधारित अभ्यासक्रमांपर्यंत झाला आहे. संगणक, माहिती-तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिकी, स्थापत्य यांसह विविध शाखांमध्ये विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे देशभरातून विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुण्याकडे आकर्षित होत आहेत.

मात्र पुण्याची ‘अभियंता नगरी’ ही ओळख केवळ महाविद्यालयांमुळे तयार झालेली नाही. पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहननिर्मिती आणि पूरक उद्योगांची मोठी साखळी पुण्याच्या तांत्रिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. वाहन संशोधन, चाचणी आणि प्रमाणनासाठी कार्यरत संस्था तसेच ऑटोमोबाइल क्षेत्राशी संबंधित उद्योगांमुळे यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन अभियांत्रिकी आणि आता इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानातील अभियंत्यांसाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत.

दुसरीकडे हिंजवडी, खराडी, मगरपट्टा आदी भागांमध्ये विस्तारलेल्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राने अभियंत्यांच्या कामाचे स्वरूपच बदलले आहे. माहिती-तंत्रज्ञानासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती विश्लेषण, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि सायबर सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तंत्रज्ञान मनुष्यबळ कार्यरत आहे. जागतिक कंपन्यांची अभियांत्रिकी व उत्पादन विकास केंद्रे पुण्यात वाढत असल्याने शहराची तांत्रिक परिसंस्थाही अधिक मजबूत होत आहे.

२०२६ मधील उद्योग अहवालानुसार पुण्यात ५०० हून अधिक जागतिक क्षमता केंद्रे असून, २०२४ नंतर १३० हून अधिक केंद्रांनी येथे प्रवेश केला किंवा विस्तार केला आहे. यातील सुमारे ४० टक्के केंद्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित कामकाजावर भर असल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे पुण्याचा प्रवास आता ‘शिक्षणनगरी –  औद्योगिक शहर – आयटी हब – नवतंत्रज्ञानाचे केंद्र’ असा होत आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारा अभियंता आहे.

पुण्याच्या अभियंता ओळखीचे काही पैलू – 

  • महाराष्ट्रातील ३८० अभियांत्रिकी संस्था – २०२५-२६ प्रवेश प्रक्रिया
  • पिंपरी-चिंचवड परिसरात ४,००० हून अधिक वाहननिर्मिती व पूरक उद्योग
  • पुण्यात ५०० हून अधिक जागतिक क्षमता केंद्रे असल्याचा २०२६ मधील उद्योग अहवाल
  • २०२४ नंतर १३० हून अधिक जागतिक क्षमता केंद्रांची स्थापना किंवा विस्तार
  • सुमारे ४० टक्के केंद्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताकेंद्रित कामकाज
  • २०२४-२५ मध्ये देशभरातील एसटीपीआय-नोंदणीकृत युनिट्सची सॉफ्टवेअर निर्यात १०.६९ लाख कोटी रुपये.
‘पुण्याची ओळख आज केवळ शिक्षणनगरी किंवा माहिती-तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून राहिलेली नाही; येथे वाहन उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, संशोधन आणि नवतंत्रज्ञान यांची मजबूत परिसंस्था तयार झाली आहे. त्यामुळे पुण्यातील अभियंत्यांसमोर केवळ नोकरीच्या संधींचा विचार करण्याऐवजी शहर आणि समाजाच्या गरजा ओळखून त्यावर बुद्धिमान, सुरक्षित आणि उपयुक्त तंत्रज्ञानाधारित उपाय विकसित करण्याचे आव्हान आहे. पुणे तंत्रज्ञान वापरणाऱ्या शहरापासून तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या शहराकडे वाटचाल करत आहे.’– संजय भुरेवाल, सिनिअर आर्किटेक्ट, पुणे.

हे सुद्धा वाचा  : माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

‘पुण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार वेगाने होत असला, तरी तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी माणूस असणे महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर विकसित करण्याची पद्धत बदलू शकते; मात्र पुण्यासारख्या तंत्रज्ञानकेंद्रात काम करणाऱ्या अभियंत्यांनी शहरातील आणि समाजातील प्रत्यक्ष समस्या समजून घेऊन योग्य प्रश्न विचारणे आणि तयार केलेल्या तंत्रज्ञानाच्या परिणामांची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यातील अभियंत्यांकडे तांत्रिक कौशल्याबरोबरच सामाजिक जाणीवही असणे गरजेचे आहे.’ – सीमा शिरवळ, सॉफ्टवेअर डेव्हलपर, पुणे.

Web Title: Pune is forging a new identity as a city of engineers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune city
  • pune news

संबंधित बातम्या

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
1

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

Amravati News: एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड
2

Amravati News: एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन
3

तुकोबांची वेशभूषा अन् बाप्पाचं स्वागत; नगरसेवक सुनील पांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन
4

Pune Ganeshotsav 2026: ४ अप्पर आयुक्त, १४ उपायुक्त अन् १००-हो गार्ड्स; गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा मास्टर प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.