Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday Pune Metro: पुणेकरांच्या सेवेत मेट्रोला 3 वर्षे पूर्ण; दैंनदिन प्रवासी संख्या तब्बल….

पुणे मेट्रोचे ६ मार्च २०२२ रोजी  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले होते. यानंतर दोन प्रारंभिक मार्गांसह, पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वानझ ते गरवारे कॉलेज या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 08, 2025 | 02:35 AM
Happy Birthday Pune Metro: पुणेकरांच्या सेवेत मेट्रोला 3 वर्षे पूर्ण;  दैंनदिन प्रवासी संख्या तब्बल….
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  पुणे मेट्राेच्या सेेवेला तीन वर्ष पूर्ण हाेत आहेत.  सुमारे एक लाख ६० हजार प्रवासी प्रति दिन मेट्राेने प्रवास करीत आहेत. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत पुणेकरांना चांगला पर्याय उपलब्ध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात ६ मार्च २०२२ रोजी पहिल्यांदा मेट्राे धावली हाेती. टप्प्या टप्प्याने सेवा वाढविली गेली,  मेट्रो मार्गांच्या  नेटवर्कचा विस्तार झाल्याने पुणेकरांसाठी एक वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे.

पुणे मेट्रोचे ६ मार्च २०२२ रोजी  पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उद्घाटन केले होते. यानंतर दोन प्रारंभिक मार्गांसह, पीसीएमसी ते फुगेवाडी आणि वानझ ते गरवारे कॉलेज या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू झाली. त्या नंतर, मेट्रो नेटवर्कचा पुढे विस्तारित होत गेले. पुणे मेट्रोच्या सुरुवातीच्या काळात २१,४७,७५७ प्रवासी होते (मार्च २०२२ ते जुलै २०२३ पर्यंत). १ ऑगस्ट २०२३ रोजी फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय, जिल्हा न्यायालय ते रूबी हॉल क्लिनिक आणि गरवारे कॉलेज ते जिल्हा न्यायालय या मार्गिकांच्या उद्घाटनानंतर प्रवसी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि १,२३,२०,०६७ झाली.

रूबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या विस्तारामुळे प्रवासी संख्या १,६९,६९,५५४ पर्यंत पोहोचली. २९ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मार्गिकांच्या उद्घाटनाने, ६ मार्च २०२२ ते ५ मार्च २०२५ या कालावधीत एकूण प्रवासी संख्या ५,९८,७६,७४३ झाली, त्याचबरोबर एकूण महसूल ९३,००,०४,२६८ रुपये झाला. पुणे मेट्रोची दररोजची सरासरी प्रवासी संख्या सुमारे १,६०,००० आहे.

पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग

स्वारगेट ते कात्रज या भुयारी मेट्राे मार्गाचे आरेखन बदलण्यात आले आहे.  हा मार्ग आता शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जाणार नाही असे महामेट्राेने स्पष्ट केले आहे. पुणे शहरातील मेट्राे मार्गांचे विस्तारीकरण केले जाणार आहे. यामध्ये इतर मेट्राे मार्गाप्रमाणेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा समावेश आहे. हा मार्ग भुयारी असुन, ताे सातारा रस्त्यावर धनकवडी येथील शंकर महाराज समाधी मठाच्या खालून जात आहे. अशी माहीती पुढे आली हाेती. सदर मार्ग हा समाधी मठाच्या खालून जात असल्याने मठाचे विश्वस्त, प्रशासन यांनी महामेट्राेला सदर मार्ग समाधी मठाच्या खालून नेण्यात येऊ नये अशी मागणी केली हाेती. या मागणीची महामेट्राेने दखल घेतली आहे.

Pune Metro News: पुण्यातील ‘हा’ भुयारी मार्ग बदलण्याचा महामेट्रोचा मार्ग; मात्र नक्की कारण काय?

महामेट्राेने श्री सदगुरु संतवर्य याेगीराज शंकरमहाराज समाधी ट्रस्टला पत्र पाठविले आहे. सदर मार्गचे आरेखन बदलण्यात आले आहे.  समाधीच्या बाहेरून मार्गस्थ करण्यासाठी मार्गिकेचे आरेखन सुधारीत केले जात आहे. महामेट्राेने शहरातील मध्यभागातून भुयारी मार्ग आणि स्टेशन उभारले आहे. हे उभारताना परीसरातील काेणत्याही इमारतीला हानी पाेहचणार नाही याची काळजी घेतली आहे.

Web Title: Pune metro service completed three years daily one lakh 60 lakhs passengers travel in metro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Pune
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
1

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
2

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
3

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
4

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.