Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

एसटीची मालकी असलेली आठ एकरांची जागा असून त्यापैकी चार एकर पीएमपीएमएलला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.  या जागेवर सुमारे ८० बसगाड्या थांबू शकतील, असे आगार बांधकामाचे नियोजन आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 26, 2025 | 02:35 AM
Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड  (पीएमपीएमएल) आणि महाराष्ट्र स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशन  (एसटी महामंडळ) यांच्या दरम्यान आळंदी परिसरात नवीन बस आगार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत एसटीकडून चार एकर जमीन पीएमपीएमएलला देण्यास मंजूरी मिळाली आहे.

प्रस्तावनुसार, एसटीची मालकी असलेली आठ एकरांची जागा असून त्यापैकी चार एकर पीएमपीएमएलला हस्तांतरीत करण्यात येणार आहे.  या जागेवर सुमारे ८० बसगाड्या थांबू शकतील, असे आगार बांधकामाचे नियोजन आहे. या निर्णयामुळे आळंदी आणि आसपासच्या भागातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे. बस आगारामुळे बस रॅपिंग, देखभाल व पार्किंगची सोय सुलभ होईल आणि प्रवाशांना नियमित सेवा मिळण्यास मदत होईल.|

स्थानिक वाहनधारक तसेच प्रशासनाने या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आता पुढील टप्प्यात विभागीय आयुक्त कार्यालयातून आवश्यक कागदपत्रांची परवानगी, जागेचे नकाशे मान्यता करणे व बांधकामाचा समावेश होईल. या प्रकल्पाचे वेळापत्रक आणि बांधकाम खर्च याबाबत अधिक माहिती पुढील महिन्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात

पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा म्हणून पीएमपीला ओळखले जाते. रोज सुमारे ११ लाख प्रवाशाना आपल्या इच्छित स्थळी पोहचविणाऱ्या या पीएमपीचे स्टियरिंग आता ठेकेदारांच्या हाती जात आहे. सध्या पीएमपीचे स्व मालकीचे १ हजार २५ बस असून ठेकेदारांचे १ हजार १७३ बस आहेत. येत्या काही महिन्यात पीएमपीमध्ये १ हजार नवीन सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यावेळी ठेकेदारांची बस संख्या ही २ हजार १७३ होईल. पीएमपीत ठेकेदारांचे वाढते वर्चस्व हे नक्कीच सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने नुकसानदायक ठरणार आहे.

Pune News : पीएमपीचे ‘स्टेरिंग’ ठेकेदारांच्या हातात, लवकरच १ हजार बस धावणार रस्त्यावर..

पीएमपीच्या ताफ्यात सध्या एकूण २,१९८ बस आहेत. यापैकी १,१७३ बस ठेकेदारांच्या मालकीच्या आहेत, तर १,०२५ बस पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. सध्या ४९० इलेक्ट्रिक बस, १,२८१ सीएनजी बस आणि २२७ डिझेल बस पीएमपीमध्ये कार्यरत आहेत. यापैकी ७९८ सीएनजी आणि सर्व २२७ डिझेल बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत, तर ४९० इलेक्ट्रिक व ४८३ सीएनजी बस ठेकेदारांच्या आहेत.आता लवकरच १,००० नवीन सीएनजी बस ताफ्यात दाखल होणार असून त्या सर्व ठेकेदारांच्या मालकीच्या असणार आहेत. त्यामुळे पीएमपीच्या बस व्यवस्थापनात खाजगीकरणाचा झपाट्याने शिरकाव होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

Web Title: Pmp gets 4 acres of land from st corporation for alandi bus depot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • alandi
  • msrtc
  • PMPML
  • pune news

संबंधित बातम्या

RTO News: शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट येताय? मग ‘ही’ बातमी नाकी वाचा
1

RTO News: शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट येताय? मग ‘ही’ बातमी नाकी वाचा

Parth Pawar Land Scam: वादग्रस्त अमेडिया कंपनीबाबत महत्वाची बातमी! ४ डिसेंबरपर्यंत…
2

Parth Pawar Land Scam: वादग्रस्त अमेडिया कंपनीबाबत महत्वाची बातमी! ४ डिसेंबरपर्यंत…

Crime News: पुण्यात चाललंय काय? लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला… ; आरोपीला UP मधून बेड्या
3

Crime News: पुण्यात चाललंय काय? लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला… ; आरोपीला UP मधून बेड्या

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा
4

पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ढकलली पुढे; आता 22 फेब्रुवारीला घेतली जाणार परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.