Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांसाठी मोठी बातमी! उन्हाळी सुट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी पुणे विभागाचा ‘हा’ निर्णय; थेट…

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत विद्यार्थी,शिक्षक,विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि कारखान्यातील कामगार मोठ्या प्रमाणात गावाकडे जात असतात.त्यामुळे होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 30, 2026 | 02:35 AM
प्रवाशांसाठी मोठी बातमी! उन्हाळी सुट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी पुणे विभागाचा ‘हा’ निर्णय; थेट…
Follow Us
Follow Us:

गर्दी कमी करण्यासाठी जादा बसेस सोडण्याचा निर्णय
एसटी विभागातून उन्हाळ्यात ७४ अतिरिक्त गाड्या
पुणे एसटी विभागाचा मोठा निर्णय

पुणे: महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) पुणे विभागातून उन्हाळी सुट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी ७४ बसेस अतिरिक्त सोडण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत विद्यार्थी,शिक्षक,विविध क्षेत्रातील कर्मचारी आणि कारखान्यातील कामगार मोठ्या प्रमाणात गावाकडे जात असतात.त्यामुळे होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दि.१४ एप्रिल ते १० जून २०२६ दरम्यान (MSRTC) जादा बसेस सोडण्याचा निर्णय पुणे एसटी विभागाने घेतला आहे.

अतिरिक्त गाड्या कुठे सोडल्या जाणार?

अतिरिक्त गाड्या साधारणता अक्कलकोट,तासगाव,कोल्हापूर,पंढरपूर,जळगाव,कळण, सप्तशृंगी,अकोला,अहमदपूर,गोंदवले या ठिकाणी सोडल्या जाणार आहेत.

उन्हाळ्यात प्रवाशांना आपल्या गावी जाण्यासाठी पुणे एसटी विभागातून साधारणता ७४ अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत.प्रवाशांनी एसटीतून प्रवास करून या सेवेचा लाभ घ्यावा.

– कमलेश धनराळे,

विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे एसटी विभाग

पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस दाखल

राज्य परिवहन महामंडळ (एसटी) महिला आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी आधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुण्यात बुधवारी (दि.२५) रोजी दाखल झाली आहे.५६ सीटची एक बस पुण्यात आली असून स्वारगेट-बारामती सेवेला प्रारंभ झाला.पुणे शहरात पाठवलेली ही राज्यातील पहिली बस आहे.पुढील दोन महिन्यात पुणे विभागात २५० बस दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली आहे.

MSRTC News: पुणे विभागात ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस दाखल; पुढील दोन महिन्यात…

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बस तयार करण्यात आली असून ही बस विनावातानुकूलित आहे. या बसेस प्रामुख्याने दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

नव्या बसेसची वैशिष्ट्ये

या बसेसमध्ये एकूण ५६ आसन क्षमता आहे, जी सध्याच्या बसेसपेक्षा १६ आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या डॅशबोर्डवर १ तर बसमध्ये ४ सीसीटीव्ही कॅमेरे असे एकूण ५ कॅमेरे आहेत.तसेच जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे.यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे.

Web Title: Pune msrtc department run 74 extra buses for summer benefits to passengers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • msrtc
  • pune news
  • ST buses

संबंधित बातम्या

Pune Teacher Constituency: शिक्षक मतदारांना पैशांचे प्रलोभन? दत्तात्रय सावंत, डॉ. बी. पी. रोंगे यांची टीका
1

Pune Teacher Constituency: शिक्षक मतदारांना पैशांचे प्रलोभन? दत्तात्रय सावंत, डॉ. बी. पी. रोंगे यांची टीका

पुण्यातील ‘त्या’ गावांच्या विकासासाठी महापालिका थेट जागतिक बँकेकडून कर्ज घेणार
2

पुण्यातील ‘त्या’ गावांच्या विकासासाठी महापालिका थेट जागतिक बँकेकडून कर्ज घेणार

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
3

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा
4

Maharashtra Politics: ‘आंदोलनाशी संबंधित व्यक्तींनी आयुक्तांच्या विरोधात…’; संजय निरुपमांचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.