Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा? महापालिकेकडून पुढील तीन महिन्यांसाठी नियोजन सुरू

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात अवघा ५.५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने महापालिकेने पुढील तीन महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन सुरू केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2026 | 11:32 AM
पुण्यात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा? महापालिकेकडून पुढील तीन महिन्यांसाठी नियोजन सुरू

पुण्यात ‘एक दिवसाआड’ पाणीपुरवठा? महापालिकेकडून पुढील तीन महिन्यांसाठी नियोजन सुरू

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात अवघा ५.५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने महापालिकेने पुढील तीन महिन्यांसाठी पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार काही दिवसांत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे. त्यावर येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.

महापालिका प्रशासनाच्या अंदाजानुसार, सध्याच्या प्रमाणात पाणीपुरवठा सुरू ठेवला तर धरणातील उपलब्ध पाणीसाठा जुलै अखेर पर्यंत पुरेल. त्यामुळे पाणी कपातीचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन आहे. शहराशी संबंधित महत्त्वाचा निर्णय असल्याने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

जून महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी शहरात अद्याप पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावलेली नाही. तसेच मान्सूनलाही सुमारे दोन आठवड्यांचा विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आतापासूनच पाणी वापरावर नियंत्रण ठेवल्यास पुढील काळातील संकट टाळता येऊ शकते, असे प्रशासनाचे मत आहे.

हे सुद्धा वाचा : बारामती-इंदापूरमध्ये मान्सूनचा जोरदार शिरकाव; काही भागांत तीन तासांहून अधिक मुसळधार पाऊस

तीन महिन्यांसाठी ४.८० टीएमसीची आवश्यकता

पुणे शहरासाठी दरमहा सुमारे १.६० टीएमसी पाणी लागते. त्यानुसार पुढील तीन महिन्यांसाठी ४.८० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. याशिवाय या कालावधीत सुमारे १.८० टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा अंदाज आहे. शेतीसाठी सुरू असलेल्या आवर्तनासाठी आणखी ०.८० टीएमसी पाणी लागणार आहे. म्हणून प्रत्यक्षात धरणांमध्ये किमान ६.६० टीएमसी पाणीसाठा असणे आवश्यक आहे. मात्र सध्या केवळ ५.५ टीएमसी पाणी उपलब्ध असल्याने प्रशासनाला पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा विचार करावा लागत आहे.

“खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये डेड स्टॉकसह केवळ ५.५ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे महापालिका दिवसाआड पाणीपुरवठ्याचा विचार करत आहे. यामुळे पुणेकरांना गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. भाजपने दिलेले २४x७ पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्णपणे फसले आहे. पाणी व्यवस्थापनातील हलगर्जीपणा आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.” – डॉ. अभिजीत मोरे , आम आदमी पक्ष.

पाणी शुल्काचा वाद मुख्यमंत्र्यांपर्यंत

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणीपट्टी व अतिरिक्त पाणी वापर शुल्काचा वाद आता मुख्यमंत्री दरबारात पोहोचला आहे. जलसंपदा विभागाकडून औद्योगिक दराने आकारल्या जाणाऱ्या शुल्काला महापालिकेने विरोध दर्शवत मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉर रूम’मधील आढावा बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शहराची लोकसंख्या वाढत असताना पाण्याच्या मंजूर कोट्यात वाढ करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापर होत असल्याचा दावा करत जलसंपदा विभागाकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. यामुळे दोन्ही विभागांतील वाद अधिक तीव्र झाला असून यावर शासनस्तरावर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Pune municipal corporation is planning water supply for citizens for the next three months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Pune mahapalika
  • pune news
  • water issues

संबंधित बातम्या

दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा इशारा
1

दाखला, मार्कलिस्टसाठी अवैध रक्कम वसूल करुन नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा इशारा

Pune News : बारामती-इंदापूरमध्ये मान्सूनचा जोरदार शिरकाव; काही भागांत तीन तासांहून अधिक मुसळधार पाऊस
2

Pune News : बारामती-इंदापूरमध्ये मान्सूनचा जोरदार शिरकाव; काही भागांत तीन तासांहून अधिक मुसळधार पाऊस

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त
3

RTE Admission : आरटीई प्रवेशासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; राज्यभरात 12 हजारहून अधिक जागा रिक्त

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड
4

अनधिकृत हॉटेल्सवर एसटी बस थांबवणे चालकांना पडलं महागात; थेट पगारातून वसूल होणार दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.