Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: इराण-इस्रायल युद्धामुळे पुणे महानगरपालिकेला धक्का, १८ गॅस स्मशानभूमी बंद, पीएमसीचे आवाहन

जागतिक स्तरावर इंधन आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) शहरातील १८ गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 09, 2026 | 08:34 PM
इराण-इस्रायल युद्धामुळे पुणे महानगरपालिकेला धक्का (Photo Credit- X)

इराण-इस्रायल युद्धामुळे पुणे महानगरपालिकेला धक्का (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • इराण-इस्रायल युद्धामुळे पुणे महानगरपालिकेला धक्का
  • १८ गॅस स्मशानभूमी बंद
  • पीएमसीचे आवाहन
इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाचे पडसाद आता थेट पुण्याच्या नागरी सुविधांवर उमटू लागले आहेत. जागतिक स्तरावर इंधन आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) शहरातील १८ गॅस आधारित दाहिन्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गॅस पुरवठा खंडित झाल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून, परिस्थिती सामान्य होईपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत; केंद्राच्या सूचनांनंतर पाऊल

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनंतर पुणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. मध्यपूर्वेतील संकटामुळे जागतिक इंधन लॉजिस्टिक्स आणि उपलब्धतेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे गॅस पुरवठ्यात मोठी घट निर्माण झाली असून, या दाहिन्यांचे संचलन करणे सध्या अशक्य झाले आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ५ मार्चपासूनच शहरातील सर्व १८ गॅस आधारित स्मशानभूमींमधील भट्ट्या थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी…

स्मशानभूमीतील पर्यायी व्यवस्था आणि इलेक्ट्रिक दाहिन्या सुरू

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. विशेषतः वैकुंठ स्मशानभूमीतील तीन गॅस दाहिन्या बंद असल्या तरी, तेथील पाच इलेक्ट्रिक (विद्युत) दाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, शहरातील इतर स्मशानभूमींमधील पारंपारिक (लाकूड आधारित) आणि एअर पॉल्यूशन कंट्रोल तंत्रज्ञान असलेल्या विद्युत दाहिन्यांची सेवा अविरत सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

“गॅस पुरवठा सुरळीत होताच या दाहिन्या पुन्हा पूर्ववत केल्या जातील. तोपर्यंत परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे,” असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. गॅस आधारित अंत्यसंस्कार सेवा तात्पुरती स्थगित असल्याने नागरिकांनी विद्युत दाहिन्यांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे. युद्धामुळे निर्माण झालेली ही टंचाई केवळ तांत्रिक नसून जागतिक ऊर्जा संकटामुळे उद्भवल्याने नागरिकांनी या बदलांची नोंद घ्यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

PCMC Ration Supply: रेशन कार्डधारकांचे हाल! ८ मार्चला मशीन बंद, ९ ला सुटी; आता १० मार्चला रेशन दुकानदारांसमोर मोठे आव्हान

Web Title: Pune municipal corporation suffers setback due to iran israel war 18 gas crematoriums closed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • iran
  • Iran Israel Conflict
  • Israel
  • Pune

संबंधित बातम्या

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू
1

Ketan Agarwal Murder Case: सिया गोयलला कोर्टात दिलासा मिळणार? ‘पुरावा नाही’ वकिलांचा दावा; उज्वल निकम लढणार सरकारची बाजू

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे
2

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी
3

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर
4

Ketan Agrawal Murder Case: ‘केतनला टक्कल होतं अन् तो विग वापरायचा…’, सिया गोयलचा पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा, खरं कारण आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.