Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMPML Bus News: पुणे तिथं काय उणे! सिग्नल न बघता बस पळवली ससूनच्या दारात; PMPML चालकाचे कौतुक!

PMPML Bus News: पुणे शहरात PMPML कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने एका १७ वर्षांच्या मुलीचे प्राण वाचले आहेत. चालत्या बसमध्ये मुलगी अचानक चक्कर येऊन पडली. ड्रायव्हरने क्षणाचाही विचार न करता बस थेट ससून हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात पळवली. पहाटेच्या अंधारात नक्की काय घडले?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 01, 2026 | 05:16 PM
PMPML Bus News: पुणे तिथं काय उणे! सिग्नल न बघता बस पळवली ससूनच्या दारात; PMPML चालकाचे कौतुक!

PMPML Bus News: पुणे तिथं काय उणे! सिग्नल न बघता बस पळवली ससूनच्या दारात; PMPML चालकाचे कौतुक!

Follow Us
Follow Us:
  • मुलगी बसमध्ये चक्कर येऊन पडताच ड्रायव्हरने बस थेट रुग्णालयात नेले
  • कंडक्टरने तातडीने व्हीलचेअर आणून मुलीला आत दाखल केले
  • डॉक्टरांनी इमर्जन्सी उपचार व ऑक्सिजन देऊन मुलीची प्रकृती स्थिर केली
PMPML Bus News: ‘पुणे तिथं काय उणे’ या म्हणीची अनुभूती देणारी एक अत्यंत संवेदनशील आणि अभिमानास्पद घटना पुण्यात घडली आहे. पीएमपीएमएल (PMPML) कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अफाट सतर्कतेमुळे आणि प्रसंगावधाणामुळे एका १७ वर्षांच्या तरुणीचा जीव वाचला आहे. २९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास चालत्या बसमध्ये चक्कर येऊन पडलेल्या तरुणीला ड्रायव्हर राजेंद्र निकम आणि कंडक्टर गोरखनाथ चव्हाण यांनी ठरलेला मार्ग सोडून थेट ससून रुग्णालयात नेले आणि वेळेवर उपचार मिळवून दिले.

हेही वाचा: Washim Murder Case News: “आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब…” सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!

चालत्या बसमध्ये चक्कर अन् भयंकर प्रसंग

मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास १७ वर्षांची एक तरुणी तिच्या आई-वडील आणि लहान भावासोबत PMPML बसने प्रवास करत होती. प्रवासादरम्यान अचानक ती मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली व बेशुद्ध पडली. मुलीला बेशुद्धावस्थेत पाहून तिच्या कुटुंबीयांची भंबेरी उडाली. ‘माझ्या बहिणीला काय झालंय?’ असा आक्रोश करत तिच्या लहान भावाने कंडक्टर गोरखनाथ चव्हाण यांच्याकडे धाव घेतली आणि परिस्थिती सांगितली.

सेकंदाचाही विलंब न करता ड्रायव्हरने वळवली बस

प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच कंडक्टर चव्हाण यांनी तात्काळ ड्रायव्हर राजेंद्र निकम यांना माहिती दिली. ड्रायव्हर निकम यांनी आरशात पाहिले असता मुलीची तब्येत अतिशय चिंताजनक दिसत होती आणि तिचे कुटुंब प्रचंड घाबरले होते. अशा अत्यंत ताणतणावाच्या प्रसंगी ड्रायव्हर निकम यांनी डोके थंड ठेवून मोठा निर्णय घेतला. त्यांनी कोणताही थांबा किंवा सिग्नलची पर्वा न करता ठरलेला मार्ग सोडला आणि बस थेट ससून हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाच्या दिशेने सुसाट पळवली.

हेही वाचा: Pune Water Shortage News: पुणेकरांवर पाणी कपातीचे मोठे संकट! दिवाळीनंतर शहरात ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय!

ससूनच्या दारात बस अन् डॉक्टरांची धावपळ

काही वेळातच बस सुसाट वेगाने ससून रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या दारात येऊन थांबली. बस थांबताच कंडक्टर चव्हाण यांनी तत्परता दाखवत व्हीलचेअर आणली आणि बेशुद्ध तरुणीला आत नेले. ससूनच्या डॉक्टरांनीही क्षणाचाही विलंब न करता इमर्जन्सी ट्रिटमेंट सुरू करून मुलीला ऑक्सिजन लावला. थोड्याच वेळात मुलीची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. PMPML कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: PMPML बसमध्ये नेमकी कोणती घटना घडली?

    Ans: २९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास १७ वर्षांची तरुणी चालत्या बसमध्ये चक्कर येऊन बेशुद्ध पडली होती.

  • Que: कर्मचाऱ्यांनी मुलीचा जीव कसा वाचवला?

    Ans: ड्रायव्हर राजेंद्र निकम यांनी ठरलेला मार्ग सोडून बस थेट ससून रुग्णालयात पळवली आणि कंडक्टर गोरखनाथ चव्हाण यांनी व्हीलचेअर आणून तात्काळ उपचार मिळवून दिले.

  • Que: ससून रुग्णालयात काय घडले?

    Ans: डॉक्टरांनी तातडीने इमर्जन्सी ट्रिटमेंट देऊन ऑक्सिजन लावला, ज्यामुळे तरुणीची प्रकृती धोक्याबाहेर आली.

Web Title: Pune pmpml driver and conductor girl to sassoon hospital save life sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • Bus Driver
  • Latest pune news update
  • PMPML Bus
  • Pune Sassoon Hospital

संबंधित बातम्या

Pune Water Shortage News: पुणेकरांवर पाणी कपातीचे मोठे संकट! दिवाळीनंतर शहरात ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय!
1

Pune Water Shortage News: पुणेकरांवर पाणी कपातीचे मोठे संकट! दिवाळीनंतर शहरात ‘एक दिवस आड’ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय!

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!
2

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!
3

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!

Yavatmal Rod Attack: यवतमाळमध्ये खासगी वाहनचालकाची मुजोरी! साईड देण्यावरून बसचालकाला लोखंडी रॉडने केली मारहाण
4

Yavatmal Rod Attack: यवतमाळमध्ये खासगी वाहनचालकाची मुजोरी! साईड देण्यावरून बसचालकाला लोखंडी रॉडने केली मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.