Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!

Pune Crime News: गर्दीच्या सारसबाग परिसरात २-३ दिवसांपासून उभी असलेली एक बेवारस कार... अचानक त्यातून सुटली भयंकर दुर्गंधी आणि जेव्हा पोलिसांनी दरवाजा उघडला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून सगळेच हादरले! काळेपडळवरून बेपत्ता शुभम बनसोडेचा बंद कारमध्ये कसा झाला अंत?

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 30, 2026 | 02:02 PM
Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!

Pune Crime News: पुण्यात थरार! सारसबागेजवळ बंद कारमधून येत होती दुर्गंधी; दरवाजा उघडताच पोलीस हादरले!

Follow Us
Follow Us:
  • सारसबाग नेहरू स्टेडियमसमोर बंद कारमध्ये तरुणाचा मृतदेह
  • मृत तरुण काळेपडळातून बेपत्ता असलेला शुभम बनसोडे
  • प्रचंड दुर्गंधीमुळे प्रकार उघड, खडक पोलीसांंचा तपास सुरू
Pune Crime News: पुण्यातील अत्यंत वर्दळीचा आणि मध्यवर्ती भाग मानल्या जाणाऱ्या सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोर गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रस्त्याच्या कडेला बेवारस उभ्या असलेल्या एका बंद कारमध्ये ३० ते ३५ वयोगटातील तरुणाचा सडलेल्या आणि फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:Maharashtra Accident Report: अजून किती जीव जाणार? राज्यात २६ हजार अपघातांचा हादरवणारा ग्राफ; पोलिसांची आकडेवारी जाहीर!

तीव्र दुर्गंधीमुळे उघडकीस आला प्रकार

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर एक चारचाकी वाहन गेल्या दोन-तीन दिवसांपासून एकाच जागेवर उभे होते. गुरुवारी या कारमधून अचानक प्रचंड तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना संशय आला आणि त्यांनी तातडीने खडक पोलीस ठाण्याला यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच खडक पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

मृतदेह फुगलेल्या अवस्थेत; बेपत्ता तरुणाची ओळख पटली

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारचा दरवाजा उघडून पाहिला असता, आतील सीटवर तरुणाचा मृतदेह अत्यंत फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह २-३ दिवसांपासून बंद कारमध्येच पडून राहिल्यामुळे त्याची मोठी दुर्गंधी पसरली होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत तरुणाची ओळख पटली असून शुभम बनसोडे असे त्याचे नाव आहे. शुभम हा पुण्यातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची नोंद समोर आली आहे.

हेही वाचा: Mumbai Drone Crash: शो ठरला जीवघेणा! मुंबईत उडत्या ड्रोनचा प्रवाशाला भीषण फटका; डोक्याला गंभीर दुखापत!

मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी

शुभम बनसोडे याचा मृत्यू नेमका कसा झाला? ही हत्या आहे की आत्महत्या? आणि त्याची कार नेहरू स्टेडियमसमोर कोणी आणून उभी केली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलीस सध्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारीक पडताळणी करत आहेत. तरुणाच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन (Post-Mortem) अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना पुण्यातील सारसबाग परिसरातील नेहरू स्टेडियमसमोरील रस्त्यावर घडली असून, खडक पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे आणि तो कुठून बेपत्ता होता?

    Ans: मृत तरुणाचे नाव शुभम बनसोडे असे असून तो पुण्यातील काळेपडळ हद्दीतून बेपत्ता झाला होता.

  • Que: पोलिसांना घटनेची माहिती कशी मिळाली?

    Ans: गेल्या २-३ दिवसांपासून उभ्या असलेल्या कारमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकांनी पोलिसांना कळवले.

Web Title: Pune sarasbaug nehru stadium dead body found in locked car sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Latest pune news update
  • Missing Case
  • pune crime case
  • pune murder news

संबंधित बातम्या

Pune Cyber Fraud News: पुण्यात सायबर गुन्हेगारांचा नवा प्रताप! ‘साहेबांच्या’ नावाचा गैरवापर करून उकळले १६ लाख
1

Pune Cyber Fraud News: पुण्यात सायबर गुन्हेगारांचा नवा प्रताप! ‘साहेबांच्या’ नावाचा गैरवापर करून उकळले १६ लाख

Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे… तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी
2

Pune Drugs Arrest News: बँकॉक ते पुणे… तस्करीची अशी पद्धत की अधिकारीही चक्रावले! शूजच्या सोलमधून हशिशची धक्कादायक तस्करी

Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी
3

Crime News Mumbai: तीन मुलांची आई, जुना प्रियकर अन् मुंबईतील फसवणूक! नाल्यात सापडलेल्या मृतदेहाने उघड केली खळबळजनक कहाणी

Pune High Profile Case: पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले
4

Pune High Profile Case: पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पोलिसांचा छापा! छापा टाकताच अधिकारीही चक्रावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.