NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत विचारले असता शिंदे यांनी टिप्पणी टाळली. त्यांची भूमिका त्यांनीच मांडावी. आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, असे ते म्हणाले, विलिनीकरणानंतर एनडीएसोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, असा कोणताही निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर ठरणार होता. आता याबाबत अंदाज व्यक्त करणे योग्य नाही. पुढील भूमिका ठरवण्याचा अधिकार सुनेत्रा वहिनींचा (Sunetra Pawar) आहे, असे शिंदे म्हणाले.
छगन भुजबळांनी यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात घडलेल्या लाचखोरीच्या प्रश्नावरही भाष्य केले. ते म्हणाले, आता हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे. पोलिस त्याची चौकशी करतील. गृह खाते, सीएम, डीसीएमपर्यंत काय खरे, काय खोटे ही गोष्ट जाईल. नरहरी झिरवाळ यांनी स्वतःच या प्रकरणात आपला हात असल्याचे सिद्ध झाले तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका चूक आहे. ऑफिस व मंत्रालयात अनेक लोक काम करतात. त्यामुळे कुणी काय केले त्याच्याशी काय संबंध आहे? या प्रकरणी पोलिस चौकशीमार्फत योग्य ती स्थिती स्पष्ट होईल. नरहरी झिरवाळ या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यास गेले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्यास गेले त्याची मला माहिती नाही. त्यांच्या विभागाचे काही काम असेल, असे ते म्हणाले. (Maharashtra Politics)
दुसरीकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे? ही चर्चा आजही करता येईल, महिन्याने करता येईल किंवा दोन महिन्यांनीही करता येईल. घाई करण्याचे कारण काय? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना जे योग्य वाटतील, त्यांना बोलावून या मुद्यावर चर्चा करतील. शेवटी एवढा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करूनच होईल. त्यावर एवढी घाई करण्याची गरज नाही. परंतु आज ते ठरलेच होते, ते झालेच पाहिजे असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही.






