Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain Alert: पुणेकरांनो, छत्री कपाटातच ठेवा! हवामान विभागाचा नवा अलर्ट; पुढील चार दिवस…

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 15, 2026 | 07:24 PM
Pune Rain Alert: पुणेकरांनो, छत्री कपाटातच ठेवा! हवामान विभागाचा नवा अलर्ट; पुढील चार दिवस…
Follow Us
Follow Us:

पुणेकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा
उष्णता आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त
चार दिवस पावसाची कोणतीही शक्यता नाही

पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी प्रत्यक्षात पुणेकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, कमाल तापमानात वाढ कायम राहिल्याने उष्णता आणि उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुणे शहरात पुढील चार दिवस पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सोमवारी (ता. १५) शहर आणि परिसरात कमाल तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात आली. शहरात ३६ अंश सेल्सिअस कमाल, तर २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दिवसभर कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळाले. वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवली.

Maharashtra Rain Alert: जूनमध्येही उन्हाचा चटका! पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष, ‘या’ ठिकाणी…

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात विशेष बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी (ता. १६) पुण्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तर दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांना पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष

जून महिना सुरू होऊन दोन आठवडे उलटत आले तरी राज्यात मान्सूनची जोरदार सुरुवात अद्याप झालेली नाही. राज्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी बहुतांश भागात उन्हाचा तडाखा कायम असून तापमानात विशेष घट झालेली नाही. हवामानशास्त्र विभागाने रविवारी (ता. १४) राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

Weather Update : मान्सूनचा वेग मंदावला; पुढील 48 तासांत मान्सूनची प्रगती न झाल्यास…

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी (ता.१३) नैऋत्य मान्सूनची उत्तर सीमा १८ अंश उत्तर अक्षांश व ६० अंश पूर्व रेखांशापासून हरनाई, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोठागुडेम, कर्लिगपट्टणम, पारादीप, बारीपाडा, पुरुलिया, धनबाद आणि मुझफ्फरपूरमार्गे पुढे सरकत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये, ओडिशाच्या आणखी काही भागांत तसेच दक्षिण छत्तीसगडमध्ये मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Web Title: Pune residents to wait another 4 to 5 days for the monsoon imd latest weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: जूनमध्येही उन्हाचा चटका! पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष, ‘या’ ठिकाणी…
1

Maharashtra Rain Alert: जूनमध्येही उन्हाचा चटका! पावसाच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष, ‘या’ ठिकाणी…

Weather Update : मान्सूनचा वेग मंदावला; पुढील 48 तासांत मान्सूनची प्रगती न झाल्यास…
2

Weather Update : मान्सूनचा वेग मंदावला; पुढील 48 तासांत मान्सूनची प्रगती न झाल्यास…

Weather Update : देशातील 25 राज्यांत 18 जूनपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता; एल निनोचा प्रभाव दिसणार
3

Weather Update : देशातील 25 राज्यांत 18 जूनपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता; एल निनोचा प्रभाव दिसणार

दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग
4

दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.