
RTO News: शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट येताय? मग 'ही' बातमी नाकी वाचा
ही कारवाई विशेषतः पुणे महापालिका, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे आरटीओ कार्यालय अशा नागरिकांच्या मोठ्या वर्दळीच्या शासकीय कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर करण्यात आली.
असे एकूण ११९ जणांवर दंड ठोठावण्यात आला.
यापूर्वी काही दिवस नियमित तपासणीमुळे अनेक कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर पुन्हा सुरू केला होता. परंतु नंतर कारवाई थंडावल्यानंतर कर्मचार्यांनी पुन्हा दुर्लक्ष करायला सुरुवात केल्याचे आरटीओच्या निरीक्षणात आले. यावर कठोर भूमिका घेत न्यायमूर्ती सप्रे यांनी पुणे दौऱ्यात स्पष्ट सूचना दिल्यानंतर प्रशासन पुन्हा सक्रिय झाले.