Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navale Bridge Accident: अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; चालकांची २४ तास तपासणी

कात्रज घाटातील तीव्र उतार, न्यूट्रलवर वाहन चालवू नये, वेग नियंत्रणात ठेवावा, अशा मार्गदर्शन सूचना मोटार वाहन निरीक्षकांकडून चालकांना दिल्या जाणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 23, 2025 | 02:35 AM
Navale Bridge Accident: अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अ‍ॅक्शन मोडमध्ये; चालकांची २४ तास तपासणी
Follow Us
Close
Follow Us:

नवले ब्रिजवर वाढले अपघातांचे प्रमाण
वाहनचालकांची २४ तास शारीरिक तपासणी करण्यात येणार
आरटीओच्या अधिकाऱ्यांनी नवले पूल परिसराची केली पाहणी

पुणे: नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पुणे–सातारा महामार्गावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, खेड शिवापूर टोलनाक्याजवळ दोन भरारी पथके तैनात केली आहेत. शनिवारपासून (ता. २२) जडवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची २४ तास शारीरिक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये डोळ्यांची तपासणी, मद्यप्राशन तपासणी तसेच वाहनांची तांत्रिक तपासणी समाविष्ट आहे.

नुकतीच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी नवले पूल परिसराची पाहणी करून तपासणीसाठी ठेवलेल्या जागेचा आढावा घेतला. खेड शिवापूर टोलनाक्यावरील ‘वे ब्रिज’जवळ वाहनांना थांबवून तपासणी केली जाणार आहे.

Navale Bridge Accident: वाहनांच्या तपासणीकडे आरटीओकडून दुर्लक्ष; बेशिस्त ५८ हजार वाहनधारकांवर कारवाई

चालकांचे समुपदेशनही

अपघात टाळण्यासाठी केवळ कारवाई न करता वाहनचालकांचे समुपदेशनही केले जाणार आहे. कात्रज घाटातील तीव्र उतार, न्यूट्रलवर वाहन चालवू नये, वेग नियंत्रणात ठेवावा, अशा मार्गदर्शन सूचना मोटार वाहन निरीक्षकांकडून चालकांना दिल्या जाणार आहेत. जडवाहतूक करणाऱ्या चालकांचा पूर्ण बॉडी चेकअपही करण्यात येईल.

दोन दिवसांत शंभर वाहनांवर कारवाई

महामार्गावरील वायुवेग पथकाने गेल्या दोन दिवसांत लेन कटिंग, वेगमर्यादा उल्लंघन, पासिंग संपलेले इत्यादी कारणांवरून शंभरहून अधिक वाहनांवर कारवाई केली असून, दोन लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली. शनिवारपासून ही मोहीम अधिक गतीने राबविण्यात येणार आहे.

२२ दुचाकी चालकांवर कडक कारवाई

वायुवेग पथक क्रमांक १ ने शुक्रवारी विभागीय आयुक्तालयात हेल्मेटशिवाय येणाऱ्या २२ दुचाकी चालकांवर कारवाई केली. नवले पुलावरील अपघातानंतर महामार्गासह शहरातही आरटीओने कडक मोहीम सुरू ठेवली आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी सांगितले.

Pune News: पुण्यात रिक्षाचालकांचा मनमानी कारभार; ‘नियमांचे पालन न केल्यास…’, RTO ने दिला ‘हा’ इशारा

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कारवाईबरोबरच चालकांचे समुपदेशन आणि शारीरिक तपासणीही आवश्यक आहे. शनिवारपासून याची अंमलबजावणी सुरू करणार आहोत.

–       अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Web Title: Pune tro check the all heavy vechiles for safety navale bridge accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Navale bridge Accident
  • pune news
  • Pune RTO

संबंधित बातम्या

पुणे तिथे काय उणे! मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन; मोठा धोका टळला
1

पुणे तिथे काय उणे! मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन; मोठा धोका टळला

भावाच्या खुनानंतर गुन्हेगारीत प्रवेश, पुण्याच्या मध्यभागात दहशत; वाचा उमेश चव्हाण टोळीचा संपूर्ण इतिहास
2

भावाच्या खुनानंतर गुन्हेगारीत प्रवेश, पुण्याच्या मध्यभागात दहशत; वाचा उमेश चव्हाण टोळीचा संपूर्ण इतिहास

दौंड तालुक्यात वनविभाग Action मोडवर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 9 ठिकाणी लावले पिंजरे
3

दौंड तालुक्यात वनविभाग Action मोडवर, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी 9 ठिकाणी लावले पिंजरे

Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार? नोंदणी विभागाकडून Amadia कंपनीवर…
4

Parth Pawar यांच्या अडचणी वाढणार? नोंदणी विभागाकडून Amadia कंपनीवर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.