वाहनांच्या तपासणीकडे आरटीओकडून दुर्लक्ष (फोटो- सोशल मिडिया)
पुण्यातील नवले ब्रिजवर झाला भीषण अपघात
नवले ब्रिजवर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ
तब्बल 58 हजार बेशिस्त वाहनाधारकांवर कारवाई
पुणे: राज्याच्या परिवहन विभागाकडून प्रत्येक राज्याच्या सीमेवरील चेक पोस्टवर, बेदरकारपणे गाड्या चालविणाºया महामार्गावर कारवाई करण्यात येते. मात्र, अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे आरटीओकडून जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत दोषी वाहने, नियम मोडणाºया ५८ हजार ३३३ वाहनांवर कारवाई करण्यात आली. मात्र, नवले पुलाजवळ झालेल्या या अपघातामुळे वाहनांच्या तपासणीकडे आरटीओकडून दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना, बेदरकारपणे गाड्या चालवणाºयांवर वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शिवाय वाहने चालवताना नियम मोडल्यास मोठी दंडात्मक रक्कम वसूल केली जाते. गुरुवारी (दि.१३) रोजी नवले पुलाजवळ झालेल्या गंभीर अपघाताने वाहन तपासणी आणि अंमलबजावणीतील त्रुटींवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. संबंधित वाहनाची तपासणी योग्यरीत्या झाली होती काय, याबाबत संशय व्यक्त होत असून अनेक वाहनचालकांवर कारवाई होऊनही धोकादायक वाहने महामार्गांवर निबंर्धाशिवाय फिरत असल्याचेही उघड झाले आहे. केवळ चेकपोस्टवरील कारवाई पुरेशी नसून, महामार्गावरील सततची गस्त, तांत्रिक वाहन तपासणी केंद्रे आणि टोल नाक्यावरही कठोर तपासणी आवश्यक आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० हजारांहून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यातून २९ कोटी ४१ लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. तरीही वाहनधारकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन करण्यात येते. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शिवाय अपघात झाल्यावर केवळ वाहन तपासणीवर भर देण्यात येते. मात्र, हाती काही लागत नाही. दरम्यान, यामध्ये निष्पाप लोकांना जिवाला मुकावे लागत आहे.
Pune शहरातील नवले ब्रिजवर भीषण अपघात; वाहनांच्या धडकेत आगीचा भडका; ७ जणांचा मृत्यू
वाहनचालकांवरील कारवाई
– एकूण चालन-५८,३३३
– भरलेले चालन-१६,९९९
– पेडिंग चालन-४१,३३४
– एकूण दंड-२९,४१,२०,२५१
– भरलेले दंड-१७,२२,१६,४०१
– थकीत दंड-१२,१९,१३,८५०
नवले ब्रिजवर भीषण अपघात
पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर भीषण अपघात झाला आहे. नवले ब्रिजवर वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यावर या वाहनांनी पेट घेतला आहे. या भीषण अपघातामध्ये तीन ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.
दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या लोकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर सातत्याने अपघात झाल्याच्या घटना पाहायला मिळतात.






