Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP चे 300 कोटींचे बजेट मंजूर; ९ कोटींची मर्यादित वाढ, नव्या योजनांवर देण्यात आला भर

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय, शिक्षण आणि सक्षमीकरण या विचारांना केंद्रस्थानी ठेवून वर्षभरातील उपक्रम आणि प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 17, 2026 | 05:46 PM
Pune ZP चे 300 कोटींचे बजेट मंजूर; ९ कोटींची मर्यादित वाढ, नव्या योजनांवर देण्यात आला भर
Follow Us
Follow Us:

पुणे झेडपीचा 300 कोटींचे बजेट मंजूर
विविध नवीन योजनांवर दिला गेला भर
यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण ५८ योजनांचा समावेश

पुणे: जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ साठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प १७ मार्च रोजी मंजूर करण्यात आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ९ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मर्यादित वाढ असूनही विविध नवीन योजनांवर भर देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अर्थसंकल्पाबाबत माहिती देताना सांगितले की, यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण ५८ योजनांचा समावेश असून त्यापैकी २५ योजना नव्याने प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय, शिक्षण आणि सक्षमीकरण या विचारांना केंद्रस्थानी ठेवून वर्षभरातील उपक्रम आणि प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. विद्यार्थी व शिक्षकांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी सुसंगत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण, जिल्ह्यात दोन ठिकाणी सायन्स पार्क उभारणी, तसेच रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वृद्धीसाठी ‘निपुण पुणे’ अंतर्गत दरमहा परीक्षा आयोजित करण्याचेही नियोजन आहे. विद्यार्थ्यांसाठी युरोपियन स्पेस सेंटर येथे वैज्ञानिक सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाची तारीख ठरली; प्रशासकांकडून होणार सादरीकरण

दिव्यांगांसाठी स्वावलंबन योजना, विधवा व घटस्फोटीत महिलांसाठी ‘माझे अस्तित्व’ योजना, तसेच प्रशासकीय क्षमतावृद्धीसाठी जिल्हा परिषद फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. महिलांमध्ये कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी एचपीव्ही लसीकरण मोहीमही हाती घेण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत सोलर पार्क उभारणी, अक्षय ऊर्जा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन आणि बायोगॅस प्रकल्प यांना प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासाठी संयुक्त डेटा सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ३०३ शाळांमध्ये ‘मॉडेल स्कूल’ उपक्रम सुरू करण्यात आला असून ५५ मॉडेल पीएससी केंद्रेही कार्यरत करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी ‘बाल संसद’ योजना राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद शाळांचे सीबीएसई संलग्निकरण, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आणि ‘ग्लोबल गुरुजी’सारखे कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत.
अर्थसंकल्पाच्या उत्पन्नामध्ये मुद्रांक व नोंदणी शुल्काचा सर्वाधिक ४२.२८ टक्के वाटा असून, खर्चामध्येही ३८.२१ टक्के रक्कम या घटकावर खर्च होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मर्यादित वाढीच्या पार्श्वभूमीवर नव्या योजनांची अंमलबजावणी कशी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

एकूण खर्चाचा रुपया 
1. प्रशासन ०.५० %
2. सामान्य प्रशासन १.६९%
3. पंचायत विभाग ७.२१ %
4. मुद्रांक शुल्क ३८.२१%
5. पं.स .उपकर ०.६६%
6. वित्त विभाग ५.६५ %
7. शिक्षण ५.३६ %
8. बांधकाम दक्षिण ८.३१ %
9. बांधकाम उत्तर ६.४६%
10. पाटबंधारे १.९३%
11. वैद्यकीय २.३०%
12. ग्रा. पा. पु २.०८%
13. कृषी २.०८%
14. पशुसंवर्धन १.९९%
15. समाज कल्याण ८.३६%
16. दिव्यांग कल्याण ३.०६%
17. महिला व बालकल्याण ४.१८ %

Pune ZP : सुनेत्रा पवारांकडे निर्णयाचा अधिकार; काही इच्छुकांकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सह्यांचे राजकारण

एकूण जमेचा रुपया
1. जमीन महसूल उपकर ४.४१%
2. मुद्रांक व नोंदणी शुल्क ४२.२८%
3. विक्रीय वस्तू व सेवा यावरील कर ०.३९%
4. व्याजाच्या जमा रकमा ७.७२%
5. पंचायतराज कार्यक्रम १.९१%
6. इतर जमा ३२.३९%
7. सुरुवातीची शिल्लक १०.९०%

Web Title: Pune zilla parishad approved 300 crore budget with increase of 9 crore this year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Budget
  • pune news
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.