Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात अल्पावधीत झालेल्या मोठ्या वाढीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 09, 2026 | 05:32 PM
मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Follow Us
Follow Us:

बारामती/ज्ञानेश्वर मोरे : देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या दरात अल्पावधीत झालेल्या मोठ्या वाढीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशात साखरेचा मुबलक साठा असतानाही दरात अचानक वाढ कशी झाली, असा सवाल उपस्थित करत याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

बारामती येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी अमरसिंह कदम, राजेंद्र ढवाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शेट्टी यांनी २२ ऑगस्ट रोजी लिहिलेल्या पत्रात साखरेच्या दरवाढीचा तपशील मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये साखरेचा दर सुमारे ३७०० रुपये प्रतिक्विंटल होता. यंदा ऑगस्टमध्ये हा दर सुमारे ६७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच वर्षभरात प्रतिक्विंटल सुमारे ३००० रुपयांची वाढ झाली आहे. अलीकडील काळातही किलोमागे सुमारे २० रुपयांची अचानक वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

देशातील साखरेच्या उपलब्धतेबाबतही शेट्टी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. २०२४-२५ मध्ये सुमारे २६० लाख टन, तर २०२५-२६ मध्ये सुमारे २९० लाख टन साखरेचे उत्पादन झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मागील हंगामातील सुमारे ५० लाख टन प्रारंभिक साठा धरल्यास देशात मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध असताना दरवाढ होण्यामागचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, वाढलेल्या साखर दराचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे का, हा महत्त्वाचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सध्याच्या बाजारभावानुसार ऊस उत्पादकांना प्रतिटन सुमारे ५५०० रुपये दर मिळायला हवा, मागील वर्षी पुरवलेल्या उसासाठी अतिरिक्त १००० रुपये प्रतिटन देण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे.

शक्तीपीठ महामार्गाला कायम विरोधच

शक्तिपीठ महामार्गामुळे संबंधित जिल्ह्यातील हजारो एकर बागायत जमिनी संपादित होणार आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांना भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. वास्तव पहता धार्मिक स्थळांना या महामार्गाचा फायदा होणार नाही. सध्याचे बांधलेले महामार्ग असताना, शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? असा सवाल करत, ज्या कारणासाठी हा महामार्ग बांधण्याचे नियोजन आहे, मात्र प्रत्यक्षात अनेक धार्मिक स्थळांच्या लांबून हा महामार्ग जाणार आहे. संत सावता माळी यांचे जन्मगाव असलेल्या श्रीक्षेत्र अरण येथून सावता महाराजांच्या मंदिराच्या वरून हा महामार्ग जाणार आहे, त्यामुळे हा शक्तिपीठ महामार्ग धार्मिक स्थळे स्मृती आड करण्यासाठी बांधला जातोय का, हा सवाल व्यक्त करत या महामार्गाला आमचा कायम विरोध असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करा

केंद्र सरकारने दरवाढ रोखण्यासाठी कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिल्याच्या निर्णयावरही शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयात केलेली साखर बाजारात आल्यानंतर पुढील हंगामात दर कोसळून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे साखरेचे दर नियंत्रित करताना ऊस उत्पादकांच्या हिताचे संरक्षण करावे आणि संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट…

साठेबाजी, काळाबाजार, कृत्रिम टंचाई

साखरेची साठेबाजी, काळाबाजार किंवा कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी शेट्टी यांनी केली आहे. मागील सहा महिन्यांतील साखरेची विक्री, साठा व साखर कारखानदार आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे. या व्यवहारांत २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Raju shetti has criticized the central government over the hike in sugar prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
1

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
2

SIR Process Protest: SIR प्रक्रियेला इंडिया आघाडीचा विरोध! शासन आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ
3

Ahilyanagar Drought: अहिल्यानगरमध्ये दुष्काळाचे भीषण संकट; पिके जळाली, जनावरे विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
4

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.