Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रक्तदान म्हणजे नवजीवन’ , पुण्यातील ‘या’ व्यक्तीनं केलं १८२ वेळा रक्तदान; तरुणांना दिला महत्वपूर्ण, ‘गिनिज’मध्येही नोंद

World Blood Donor Day : रक्तदान म्हणजे नवजीवनाचा मार्ग म्हणत १८२ वेळा पुण्यातील जेष्ठ रक्तदाता आणि 'रक्ताचे नाते' ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी रक्तदानाची गरज अधोरेखित केली आहे. त्यांनी तरुणांना जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 14, 2026 | 12:23 PM
World Blood Donor Day

World Blood Donor Day

Follow Us
Follow Us:
  • रक्तदान म्हणजे नवजीवन
  • पुण्यातील ‘या’ व्यक्तीनं केलं १८२ वेळा रक्तदान
  • तरुणांना दिला महत्वपूर्ण संदेश
World Blood Donor Day : सुनयना सोनवणे : रक्तदान ही केवळ सामाजिक कृती नसून एखाद्याला नवजीवन देण्याचा मार्ग आहे आणि रक्तदाता हा संपूर्ण रक्तदान व्यवस्थेचा केंद्रबिंदू असायला हवा, असे मत १८२ वेळा रक्तदान करणारे पुण्यातील ज्येष्ठ रक्तदाता आणि ‘रक्ताचे नाते’ ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी व्यक्त केले. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त त्यांनी रक्तदान चळवळीसमोरील आव्हाने, बदलती सामाजिक मानसिकता आणि रक्तदात्यांना मिळणाऱ्या सन्मानाच्या गरजेवर ‘नवराष्ट्र’शी संवाद साधला.

World Blood Donor Day : एक थेंब आशेचा! रक्तदानात महाराष्ट्र आघाडीवर; 10 लाखांचा आकडा होतोय पार

वयाच्या अवघ्या १८व्या वर्षापासून सुरू झालेला त्यांचा रक्तदानाचा प्रवास आजही सुरू आहे. सुरुवातीला सामाजिक कार्य म्हणून सुरू केलेले रक्तदान पुढे आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्याचे ते सांगतात. २०११ मध्ये त्यांनी शंभरावे रक्तदान पूर्ण केले आणि आजपर्यंत रक्त, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा दानासह १८२ वेळा रक्तदान केले आहे.

कोविड काळातही त्यांनी समाजासाठी सक्रिय योगदान दिले. त्या काळात अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळलेले असताना मदतीसाठी पुढे येत त्यांनी १५ वेळा प्लाझ्मा दान केले. याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आहे. हा विक्रम करण्याचा हेतू नव्हता, तर गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याची भावना होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

रक्तदाता दिन साजरा करताना केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता रक्तदात्यांना केंद्रस्थानी ठेवले पाहिजे, असे बांगड यांचे मत आहे. रक्तदात्याला योग्य सन्मान आणि सामाजिक मान्यता मिळाल्यास तो पुन्हा उत्साहाने रक्तदानासाठी पुढे येतो. यासाठी शासकीय पातळीवरही अधिक सक्रियपणे गौरवाची व्यवस्था असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

रक्तदान क्षेत्रातील सध्याच्या आव्हानांबाबत बोलताना त्यांनी मे ते जुलै या कालावधीत सातत्याने रक्तटंचाई जाणवत असल्याचे सांगितले. पुण्यासारख्या मोठ्या शहरात दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज असते. वाढत्या कर्करोग उपचारांमुळे तसेच मोठ्या शस्त्रक्रियांमुळे रक्त, प्लेटलेट्स आणि विशेष रक्तघटकांची मागणी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष रक्तदान प्रक्रियांबाबत त्यांनी सांगितले की, प्लेटलेट्स दानासाठी साध्या रक्तदानापेक्षा अधिक वेळ द्यावा लागतो. काही प्रक्रिया तीन तासांपर्यंत चालतात. मात्र या प्रक्रियांमुळे गंभीर रुग्णांना मोठा आधार मिळतो.

तरुणांच्या सहभागाविषयी चिंता व्यक्त करताना बांगड म्हणाले की, सामाजिक सहभाग कमी होण्यामागे आत्मकेंद्री जीवनशैली हे एक कारण आहे. मात्र भारतातील केवळ एक टक्का तरुणांनी नियमित रक्तदान सुरू केले तरी देशातील रक्तटंचाई मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

नियमित रक्तदाता राहण्यासाठी योग्य आहार, उत्तम आरोग्य आणि शिस्तबद्ध जीवनशैली आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तदानामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हा गैरसमज असल्याचे स्पष्ट करत त्यांनी वैद्यकीय निकषांनुसार केलेले रक्तदान पूर्णपणे सुरक्षित असल्याचे नमूद केले.

रक्तदान चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांनी वर्षभर नियमित आणि नियोजनबद्ध रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मोठ्या मेगा कॅम्पपेक्षा सातत्यपूर्ण आणि समन्वयातून होणाऱ्या उपक्रमांवर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रक्तपेढ्यांनी सामाजिक बांधिलकी वाढवावी आणि शासनाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, रक्तदान हे असे एकमेव दान आहे, जे दुसऱ्याला जीवन देताना स्वतःलाही समाधान देते. भारतातही रक्तदात्याला अधिक सन्माननीय स्थान मिळण्याची वेळ आता आली आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

World Eye Donation Day : अंधत्वावर आशेचा किरण! नेत्रदानाला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

Web Title: Ram bangad pune donated blood 182 times guinness record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Marathi News
  • pune news
  • world blood donor day

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.