Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बैलजोडी अन् श्वानासह उभारले वडिलांचे देखणे स्मारक; रमेश बुदगुडे यांच्या पितृप्रेमाची राज्यभर चर्चा

रमेश बुदगुडे यांनी आपले दिवंगत वडील ज्ञानोबा बुदगुडे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी घरासमोरच एक अत्यंत देखणे आणि भावूक करणारे स्मारक उभारले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2026 | 11:47 AM
बैलजोडी अन् श्वानासह उभारले वडिलांचे देखणे स्मारक; रमेश बुदगुडे यांच्या पितृप्रेमाची राज्यभर चर्चा

बैलजोडी अन् श्वानासह उभारले वडिलांचे देखणे स्मारक; रमेश बुदगुडे यांच्या पितृप्रेमाची राज्यभर चर्चा

Follow Us
Follow Us:

भोर : आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात जुन्या पिढीची संस्कृती, मूल्ये आणि संस्कारांचा विसर पडत चालल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळते. क्षुल्लक कारणांवरून वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच, दुसरीकडे पितृप्रेमाचा आणि कृतज्ञतेचा एक अनोखा अन् आदर्श वस्तुपाठ भोर तालुक्यातील भाबवडी गावात पाहायला मिळाला आहे. येथील सुपुत्र रमेश बुदगुडे यांनी आपले दिवंगत वडील ज्ञानोबा बुदगुडे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी घरासमोरच एक अत्यंत देखणे आणि भावूक करणारे स्मारक उभारले आहे.

 

वडिलांचा हाच खडतर प्रवास, त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या आठवणी पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहाव्यात, यासाठी रमेश बुदगुडे यांनी एक आगळा- वेगळा निर्णय घेतला. त्यांनी केवळ वडिलांचाच पुतळा न उभारता, वडिलांच्या पूर्णाकृती मूर्तीसोबतच त्यांच्या शेतीची शान असलेली ‘सर्जा – राजा’ ही बैलजोडी आणि कुटुंबाचे रक्षण करणारा घरातील लाडका इमानदार ‘रॉकी’ नावाचा कुत्रा यांचेही हुबेहूब आणि सुंदर स्मारक तयार केले आहे. हे स्मारक पाहताना ज्ञानोबा शेतात उभे असल्याचाच भास होतो. रमेश बुदगुडे यांचे हे अनोखे पितृप्रेम पाहून अनेक ग्रामस्थांचे डोळे पाणावले असून, संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कष्टाची जाणीव अन् मुक्या प्राण्यांबद्दलची कृतज्ञता

दिवंगत ज्ञानोबा बुदगुडे यांचे शेतीवर आणि मुक्या प्राण्यांवर अफाट प्रेम होते. अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपल्या लाडक्या ‘सर्जा-राजा’ या बैलजोडीच्या जिवावर अहोरात्र कष्ट केले. याच कष्टाच्या जोरावर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला आणि मुलांना उच्च शिक्षण देऊन समाजात मानाचे स्थान मिळवून दिले.

हे सुद्धा वाचा : हडपसरमधील अवैध हातभट्टी दारूवरुन शिवसेना आक्रमक; शेकडो लिटर गावठी दारूचा साठा नष्ट

सामाजिक बांधिलकी जपणारे समाजरत्न

वडिलांचे स्मारक उभारणारे रमेश बुदगुडे हे केवळ कौटुंबिक जबाबदारीपुरते मर्यादित नसून, सामाजिक बांधिलकीचेही भान जपणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता यांचे विचार समाजातील तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या याच उल्लेखनीय सामाजिक योगदानाची दखल घेऊन काही दिवसांपूर्वीच मावळतीर्थ राजगडावर आयोजित ऐतिहासिक जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात त्यांना ” छत्रपती शिवाजी महाराज समाजरत्न पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले होते. आपल्या वडिलांचे संस्कार आणि शिव-शाहू-फुलेंचा विचार डोळ्यांसमोर ठेवून काम करणाऱ्या रमेश बुदगुडे यांचे हे पाऊल आजच्या पिढीसाठी नक्कीच अंतर्मुख करायला लावणारे आहे.

” माझ्या वडिलांनी अत्यंत गरिबीत मुक्या प्राण्यांच्या साथीने आम्हाला लहानाचे मोठे केले. हे स्मारक केवळ एक पुतळा नसून आमच्या कुटुंबासाठी ते मंदिर आहे. त्यांच्या कष्टाची आणि संस्काराची आठवण आम्हाला दररोज होत राहील, याच भावनेतून हे स्मारक उभारले आहे.” – रमेश बुदगुडे, (पुत्र)

Web Title: Ramesh budgude of bhor taluka has erected a memorial for his late father gyanoba budgude

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Bhor Taluka
  • Dog
  • Farmers

संबंधित बातम्या

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी
1

Purandar Airport : …ही जबाबदारी आमची नाही; पुरंदर विमानळाच्या जागा निवडीवरून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती
2

पुरंदर विमानतळासाठी 40 हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश
3

पुरंदर विमानतळाच्या जागेत बदल करताना कोणते निकष लावले? मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली
4

Nashik News: शेतकऱ्यांवर तिहेरी संकट! उत्पादन खर्च वाढला, भाजीपाल्याचे दर घसरले अन् पावसानेही दडी मारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.