Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवासी डॉक्टरांच्या संपाचा ससूनच्या नियमित सेवांवर परिणाम; मोठ्या-लहान शस्त्रक्रिया घटल्या

मोठ्या शस्त्रक्रियांवर संपाचा सर्वाधिक परिणाम झाला. नियमितपणे दररोज सरासरी ५७ मोठ्या शस्त्रक्रिया होत असताना ५ ऑगस्ट रोजी केवळ १६ आणि ६ ऑगस्ट रोजी ३२ शस्त्रक्रिया पार पडल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 07, 2026 | 11:22 AM
निवासी डॉक्टरांच्या संपाचा ससूनच्या नियमित सेवांवर परिणाम; मोठ्या-लहान शस्त्रक्रिया घटल्या

निवासी डॉक्टरांच्या संपाचा ससूनच्या नियमित सेवांवर परिणाम; मोठ्या-लहान शस्त्रक्रिया घटल्या

Follow Us
Follow Us:

पुणे : निवासी डॉक्टरांच्या संपाचा फटका ससून सर्वोपचार रुग्णालयातील नियमित आरोग्यसेवांना बसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः नियोजित मोठ्या आणि लहान शस्त्रक्रियांची संख्या लक्षणीय घटली. मात्र, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग आणि गंभीर रुग्णांवरील उपचार सुरू ठेवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश आले.

संपाच्या काळात बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्या काही प्रमाणात चढ-उताराची राहिली. नियमितपणे दररोज सरासरी १६२९ रुग्ण ओपीडीमध्ये येत असताना ५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेपर्यंत १४४७ रुग्णांनी उपचार घेतले. त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी ही संख्या वाढून २१८७ वर पोहोचली. आंतरगृह रुग्ण विभागात (आयपीडी) नियमित सरासरी १०३६ रुग्ण दाखल होत असताना ५ ऑगस्ट रोजी १०२२ आणि ६ ऑगस्ट रोजी १०१७ रुग्ण दाखल झाले.

मोठ्या शस्त्रक्रियांवर संपाचा सर्वाधिक परिणाम झाला. नियमितपणे दररोज सरासरी ५७ मोठ्या शस्त्रक्रिया होत असताना ५ ऑगस्ट रोजी केवळ १६ आणि ६ ऑगस्ट रोजी ३२ शस्त्रक्रिया पार पडल्या. लहान शस्त्रक्रियांची संख्याही सरासरी १५९ वरून अनुक्रमे ३३ आणि ६३ इतकी घसरली. प्रसूती सेवांमध्येही काही प्रमाणात घट झाली असून ५ ऑगस्ट रोजी १० आणि ६ ऑगस्ट रोजी १८ प्रसूती झाल्या.

दुसरीकडे, गंभीर रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणताही अडथळा येऊ दिला गेला नाही. नियमित सरासरी ९९ रुग्णांच्या तुलनेत ५ ऑगस्ट रोजी १०८ आणि ६ ऑगस्ट रोजी ११३ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. तसेच आकस्मिक विभागात ६ ऑगस्ट रोजी १९८ रुग्णांवर उपचार करण्यात आले.

संपामुळे नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या असल्या, तरी वरिष्ठ डॉक्टर आणि उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग आणि अत्यावश्यक आरोग्यसेवा अखंड सुरू ठेवण्यात आल्याची माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. यलप्पा जाधव यांनी दिली.

नागरिकांच्या जीवाशी खेळू नका

राज्य सरकारने आणलेल्या धोरणात्मक निर्णयाला विरोध करण्यासाठी तुमच्याकडे कारणे असतील, तुमच्या समस्या आम्ही समजू शकतो, परंतु, संप करून राज्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. त्यांना वेठीस धरू नका, आम्हाला एकही मृत्यू नको आहे, अशा शब्दांत गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्यभरातील संपकरी डॉक्टरांना खडेबोल सुनावले. तसेच, तातडीने संप मागे घेण्याचे आदेश दिले. त्यांनतर, भारतीय वैद्यक परिषदेने (आयएमए) संप मागे घेतला जाईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले.

‘… तर विकासकांना थेट जेलमध्ये टाका’; Mhada ची घरे अडवणाऱ्यांना Mangal Prabhat Lodha यांचा इशारा

Web Title: Resident doctors strike affects sassoon hospital routine services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Doctors Strike
  • pune news
  • Sassoon Hospital

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
2

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.