Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा

हवेली क्रमांक सात, चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित भोंगळ कारभाराचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 25, 2026 | 05:34 PM
चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा

चंदननगरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात गोंधळ, नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी; रोहन सुरवसे पाटलांचा दावा

Follow Us
Follow Us:

पुणे : हवेली क्रमांक सात, चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित भोंगळ कारभाराचा पर्दाफाश राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केला आहे. कार्यालयात खासगी व्यक्ती संगणकावर कागदपत्रांची पडताळणी करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, हवेली क्रमांक सात चे सह दुय्यम निबंधक महादेव गुरव यांनी शासनाचा खूप मोठ्या प्रमाणात महसूल व नियमाचा भंग करून दस्त नोंदणी केली आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नोंदणी विभागासारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नागरिकांकडूनच कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. ही गंभीर बाब असल्याचे सुरवसे-पाटील यांनी म्हटले आहे. महसूल आणि नोंदणी विभागात नागरिकांच्या मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाताळली जातात. त्यामुळे या कागदपत्रांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांची योग्य पद्धतीने छाननी होणे आवश्यक आहे. मात्र, चंदननगर येथील कार्यालयातील कथित प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

‘नोंदणी कार्यालयात अधिकारी उपस्थित नसताना नागरिकच संगणकावर कागदपत्रे तपासत असतील, तर कार्यालयाचा कारभार नेमका कोणाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे?’ असा सवाल सुरवसे-पाटील यांनी उपस्थित केला. कार्यालयात दस्तऐवज आणि महत्त्वाच्या फाइल्सची सुरक्षितता कितपत राखली जाते, याचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

‘उद्या कार्यालयातून एखादी महत्त्वाची फाइल किंवा कागदपत्र गायब झाले, तर त्याची जबाबदारी कोणाची?’ असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती, कार्यालयातील कामकाजाची पद्धत आणि कागदपत्रांच्या हाताळणीबाबत तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘कार्यालयात गोंधळ सुरू असताना साहेब गायब आहेत. महसूल आणि नोंदणी विभागातील या कारभाराकडेही लक्ष द्यावे,’ असा सवाल करीत सुरवसे-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लक्ष वेधले आहे. या कथित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीचा वाद पेटला; सुनील टिंगरेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

Web Title: Rohan survase patil has exposed the chaotic functioning of the sub registrars office in chandannagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
1

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा, अन्यथा…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक
2

लोणी काळभोरमध्ये सव्वा किलोचा गांजा जप्त; 95 हजारांचा मुद्देमालही हस्तगत, दोघांना अटक

पुणे रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार; तब्बल 150 सीसीटीव्ही तपासणीनंतर टोळीला पकडले
3

पुणे रेल्वे स्थानकात बुकिंग क्लार्कवर चाकूने सपासप वार; तब्बल 150 सीसीटीव्ही तपासणीनंतर टोळीला पकडले

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…
4

पुण्यात क्रिकेटचा थरार! Sportsfield Monsoon League मध्ये स्पर्शच्या गोलंदाजीची जादू; किरण ॲकॅडमीने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.