Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार

इमारत कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तत्कालीन उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 25, 2026 | 05:19 PM
मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार

मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट; उप अग्निशमन अधिकारी चिपाडेंवर निलंबनाची टांगती तलवार

Follow Us
Follow Us:

पिंपरी : मोशी कचरा डेपोतील प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी उप अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. इमारतीला अंतिम ‘फायर एनओसी’ (अग्निशमन ना हरकत दाखला) देताना गंभीर हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. चिपाडे यांनी सादर केलेला खुलासा प्रशासनाने अमान्य केला असून, त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

मंजुरी आणि प्रत्यक्ष बांधकामात मोठी विसंगती

आयुक्तांनी बजावलेल्या नोटिशीनुसार, मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीला २०१९ मध्ये तात्पुरती एनओसी देण्यात आली होती. त्यानंतर २६ जुलै २०२३ रोजी बांधकाम परवानगी विभागाने सुधारित नकाशा मंजूर केला. या नकाशानुसार केवळ तळमजल्याच्या (G+0) ५००.५९ चौरस मीटर बांधकामास परवानगी होती. मात्र, त्याच दिवशी अग्निशमन विभागाकडून नियमांकडे दुर्लक्ष करत जी+२ (G+2) मजली आणि १,०५६.६० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या इमारतीस अंतिम फायर एनओसी देण्यात आली. मंजूर आराखडा, प्रत्यक्ष बांधकाम आणि अग्निशमन विभागाची मंजुरी यातील ही गंभीर विसंगती वरिष्ठांच्या निदर्शनास आणून न देताच अंतिम मंजुरी देण्यात आल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले आहे.

सुरक्षा नियमांचे उघड उल्लंघन

इमारतीचे अनधिकृत बांधकाम आणि सुरक्षाविषयक नियमांकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच ८ जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून ९ कामगारांचा निष्पाप बळी गेला. याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम आणि राष्ट्रीय बांधकाम संहितेतील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : मोदी सरकार झुकले! विद्यार्थ्यांच्या दबावानंतर १२ वर्षांत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा

अनधिकृत बांधकामाचा फास आणखी आवळणार?

या दुर्घटनेप्रकरणी महापालिका आयुक्तांनी यापूर्वीच मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार असून, अंतिम आदेश येणे बाकी आहे. परवानगी नसताना इमारतीचा पहिला आणि दुसरा मजला अनधिकृतपणे उभारण्यात आल्याची बाब प्रशासनाने गंभीरतेने घेतली आहे. त्यामुळे कुलकर्णी, आल्हाट आणि चिपाडे या तीन अधिकाऱ्यांनंतर हे अनधिकृत बांधकाम आणखी कोणत्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना भोवणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Rushikant chipade is likely to be suspended in connection with the moshi garbage depot accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Moshi Building
  • PCMC News

संबंधित बातम्या

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण;  १,००० कोटींचा नवोपक्रम निधी
1

केमिकल उद्योगासाठी महाराष्ट्र सरकारचा मास्टरप्लॅन, ऑक्टोबरअखेर रासायनिक क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण; १,००० कोटींचा नवोपक्रम निधी

नागरिकांची गैरसोय करणारा विकास नको; निगडीतील हरित सेतूवरून खासदार बारणेंनी प्रशासनाला सुनावले
2

नागरिकांची गैरसोय करणारा विकास नको; निगडीतील हरित सेतूवरून खासदार बारणेंनी प्रशासनाला सुनावले

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या
3

पाच वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला दांडी; वॉरंटधारक आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ
4

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.