Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात; संदीप वाघेरेंकडून प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील जलकुंभांच्या परिचालन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 05:04 PM
PCMC News, Pimpri-Chinchwad, Luxury Cars Controversy, Civic Spending, Standing Committee

PCMC News, Pimpri-Chinchwad, Luxury Cars Controversy, Civic Spending, Standing Committee

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील जलकुंभांच्या परिचालन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. या निविदांमधील अटी व शर्ती काही ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक जाचक ठेवल्याचा आरोप करत, ही निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करून नव्याने पारदर्शक निविदा प्रसिद्ध करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 

नेमका वाद काय?

पाणीपुरवठा विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निविदा क्र. पाणीपुरवठा/HO/2/39/2026-2027 आणि पाणीपुरवठा/HO/3/2/2026-2027 यांमधील अनेक अटी स्पर्धाविरोधी आणि विसंगत असल्याचे वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे. विशेषतः काही अटींमुळे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता उरलेली नसून, ‘रिंग’ पद्धतीने ठेके मिळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

प्रमुख आरोप खालीलप्रमाणे केले आहेत.

स्पर्धा मर्यादित करण्याचा प्रयत्न : निविदेतील अटींमुळे सुशिक्षित बेरोजगार, स्वयंरोजगार गट आणि सेवा सहकारी संस्थांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवले जात आहे.

अव्यावहारिक अटी : प्रत्यक्ष कामाचे स्वरूप व्हॉल्व ऑपरेशन आणि किरकोळ दुरुस्तीचे असताना, त्याला ‘परिचालन’ अशी व्यापक संज्ञा देऊन त्याद्वारे अटी जाचक करण्यात आल्या आहेत.

अनुभवाच्या अटीचा फटका : अकुशल कामगारांसाठी अनुभव प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे, जी पूर्णपणे अन्यायकारक आहे.

हे सुद्धा वाचा : पैठण तालुक्यात भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

नगरसेवक वाघेरे यांनी या प्रकरणी प्रशासनाला जाग आणण्यासाठी खालील मागण्या केल्या आहेत.

  • निविदा प्रक्रियेतील सर्व अटींची सखोल व स्वतंत्र चौकशी व्हावी.
  • ठराविक ठेकेदारांना झुकते माप देणाऱ्या अटी त्वरित रद्द कराव्यात.
  • अकुशल कामगारांसाठी असलेली अनुभवाची अट वगळण्यात यावी.
  • ‘परिचालन’ ऐवजी ‘व्हॉल्व ऑपरेशन’शी संबंधित कामाचा अनुभव ग्राह्य धरावा.
  • विद्यमान निविदा प्रक्रिया स्थगित करून सुधारित आणि स्पर्धात्मक अटींसह पुन्हा नव्याने निविदा काढण्यात यावी.
हे सुद्धा वाचा : पुण्यातील ‘या’ मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसची दुचाकींना धडक; जखमींचा आकडाही आला समोर

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय फेरबदल

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल करण्यात आला असून, प्रशासनाने तब्बल २७२ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या आणि कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ही व्यापक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेतील या मोठ्या बदली प्रक्रियेमुळे कर्मचारी वर्गात दिवसभर चर्चांचे वारे वाहत होते. या बदल्यांचा महापालिकेच्या आगामी कामकाजावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Sandeep waghere has raised objections regarding the pimpri chinchwad municipal corporations water supply tender

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
1

Bhandara News: एकलारीत वीजतारा तुटून ३ शेळ्यांचा मृत्यू! महावितरणाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
2

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
3

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
4

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.