Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच संजय काकडेंचे मोठे विधान; म्हणाले, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे…

गेल्या काही महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली असताना, विलीनीकरण होणे अशक्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 13, 2026 | 12:30 AM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच संजय काकडेंचे मोठे विधान; म्हणाले, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे...

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच संजय काकडेंचे मोठे विधान; म्हणाले, नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे...

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला संजय काकडेंचं मोठं विधान
  • मंत्रिपद आणि अध्यक्षपदावरून पेच निर्माण होण्याची शक्यता
  • अजित पवार अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी
पुणे : गेल्या काही महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली असताना, विलीनीकरण होणे अशक्य असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रश्न यामुळे विलीनीकरणात अनेक अडचणी निर्माण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट केवळ दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घेतली होती. या भेटीत विलीनीकरण किंवा अन्य कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे काकडे यांनी सांगितले. पवार कुटुंबातील दिवाळीच्या भेटीगाठी या परंपरेचा भाग असून, त्यावरून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

 

मंत्रिपदांची संख्या, राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पेच

विलीनीकरण झाल्यास दोन्ही पक्षांतील अनेक नेते मंत्रिपदासाठी इच्छुक असतील. मात्र, मंत्रिपदांची संख्या मर्यादित असल्याने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, पार्थ पवार यांच्यासह अन्य नेत्यांमध्ये रस्सीखेच होऊ शकते. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, कोअर कमिटीमध्ये कोणाला स्थान मिळणार, यावरूनही मतभेद निर्माण होतील. भाजपबाबत शरद पवारांची भूमिका पाहता दोन्ही पक्षांची राजकीय विचारधारा एकत्र येणे कठीण असल्याचे काकडे यांनी नमूद केले. राष्ट्रवादीतील २० ते २२ आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळल्या. पक्षात नाराजी असू शकते; मात्र, त्याचा अर्थ नेते पक्ष सोडणार असा होत नाही. पक्षातील महत्त्वाचे निर्णय कोअर कमिटीच्या सहमतीने घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : दर्यापूरच्या आठवडी बाजारात रक्तरंजित थरार! 60 वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत घातपात असल्याचा निष्कर्ष आताच काढता येणार नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन नेमके सत्य समोर यावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, संजय राऊत यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर केलेल्या उपरोधिक टीकेला उत्तर देताना, त्यांनी आपला पक्षच आमच्यात विलीन करा, असा टोला लगावला. तसेच, योग्य राजकीय ऑफर मिळाल्यास संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेही भाजपसोबत येऊ शकतात, असे वैयक्तिक मत त्यांनी व्यक्त केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण अशक्य असल्याचे कोणी म्हटले आहे?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण अशक्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

  • Que: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात कोणत्या अडचणी येऊ शकतात?

    Ans: मंत्रिपदांची मर्यादित संख्या, नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा, राष्ट्रीय अध्यक्षपद आणि कोअर कमिटीतील स्थान यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे.

  • Que: अजित पवार यांच्या अपघाताबाबत संजय काकडे यांनी काय मागणी केली?

    Ans: अजित पवार यांच्या अपघातामागे घातपात असल्याचा निष्कर्ष आताच काढता येणार नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Sanjay kakade has responded regarding the merger of the nationalist congress party nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • MP Sharad pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
1

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा
2

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
3

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक
4

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.