Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 11, 2026 | 08:45 PM
Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

Devendra Fadnavis : सुनेत्रा पवारांनंतर तटकरे यांची फडणवीसांशी भेट; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी विलिनिकरणाच्या चर्चांना वेग
  • सुनेत्रा पवार यांची दीड तास चर्चा
  • प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला
 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही भेट झाली. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असताना झालेल्या या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

सुनेत्रा पवार यांची दीड तास चर्चा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या एक दिवस आधी सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली होती. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने विलिनीकरणाच्या शक्यतेबाबत नव्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी प्रतिक्रिया दिली होती. दोन्ही गट स्वतंत्र राजकीय पक्ष असून, त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, विलिनीकरणाचा निर्णय घेतल्यास एनडीएतील प्रमुख घटक पक्ष म्हणून आघाडीला विश्वासात घ्यावे लागेल, असेही त्यांनी म्हटले होते. या विषयावर अद्याप आपल्याशी कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नसल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

NCP Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग! बीडमध्ये शरद पवार-अजित पवार गटाचे नेते एकत्र

प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर विलिनीकरणाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले. सुनील तटकरे यांनीही अजित पवार हयात असते, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण याच वर्षी फेब्रुवारीमध्ये झाले असते, असा दावा केला होता. याबाबत चर्चा पूर्ण झाली होती आणि आराखडाही तयार करण्यात आला होता, असे त्यांनी म्हटले होते.

मात्र, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. आता विलिनीकरणाची भाषा करणारे नेते यापूर्वी त्याच्या विरोधात का होते, असा सवाल त्यांनी केला होता.

Cabinet Decisions 2026 : मोदी सरकारचे ५ मोठे निर्णय! संग्रहालय, मेट्रोसह शेतकऱ्यांसाठी हजारो कोटींचे अनुदान

तटकरे आणि फडणवीस यांच्या ताज्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे भवितव्य आणि त्यांच्या राजकीय संबंधांबाबतच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट कधी घेतली?

    Ans: सुनील तटकरे यांनी बुधवारी, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

  • Que: ही भेट कुठे झाली?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ येथे ही भेट झाली.

  • Que: तटकरे आणि फडणवीस यांच्या भेटीचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: सूत्रांच्या माहितीनुसार, दिवाळीनिमित्त ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Ncp merger sunil tatkare meets devendra fadnavis rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • devendra fadnvis
  • Sunetra Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

NCP Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग! बीडमध्ये शरद पवार-अजित पवार गटाचे नेते एकत्र
1

NCP Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग! बीडमध्ये शरद पवार-अजित पवार गटाचे नेते एकत्र

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक
2

राष्ट्रीय स्पर्धेत बारामतीच्या मुलींची दमदार कामगिरी! कुस्ती आणि बुद्धिबळात घवघवीत यश; सुनेत्रा पवारांकडून कौतुक

राज्यात १५ हजार शिक्षकांची मेगा भरती होणार; परिचारिका पदांचीही भरती; सुनेत्रा पवार यांची माहिती
3

राज्यात १५ हजार शिक्षकांची मेगा भरती होणार; परिचारिका पदांचीही भरती; सुनेत्रा पवार यांची माहिती

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य
4

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.