Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट पदवी विक्रीप्रकरणी दुसरा आरोपी अटकेत; विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

एका विद्यार्थ्याला 70 हजार रुपयांत बनावट बी. कॉम. पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. यापूर्वी या प्रकरणात विद्यापीठातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 04, 2026 | 02:44 PM
बनावट पदवी विक्रीप्रकरणी दुसरा आरोपी अटकेत; विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बनावट पदवी विक्रीप्रकरणी दुसरा आरोपी अटकेत; विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संबंधित बनावट गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र विक्रीप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे. प्रदीप महादेव खताटे (वय ५३, रा. वारजे माळवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासात प्रदीप खताटेने एका विद्यार्थ्याला 70 हजार रुपयांत बनावट बी. कॉम. पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. यापूर्वी या प्रकरणात विद्यापीठातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो वित्त व लेखा विभागात कार्यरत असून सध्या परीक्षा विभागात नियुक्त असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुखेकरने विद्यार्थ्याच्या वडिलांकडून गुगल-पेद्वारे 70 हजार रुपये स्वीकारून खऱ्यासारखी दिसणारी बनावट गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. प्राथमिक तपासात हा गैरव्यवहार एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नसून, आणखी विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रे पुरविण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व प्रमाणपत्र वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सत्यशोधन समितीची नियुक्ती

विद्यापीठ प्रशासनाने अंतर्गत चौकशी सुरू करत कुलगुरूंच्या आदेशानुसार सत्यशोधन समितीची नियुक्ती केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

B. Com ची बनावट पदवी विकल्याचा रिक्षाचालकाचा आरोप

देशात सध्या NEET परीक्षा पेपरफुटीवरून संतापाची लाट पसरलेली असतानाच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला हादरा देणारी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी देण्याचे रॅकेट कार्यरत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला असून, एका रिक्षाचालकाला दीड लाख रुपयांत ‘बी.कॉम’चे बनावट प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.

राज्यातील परीक्षा अन् पदव्या संशयाच्या भोवऱ्यात

राज्यात आधीच MHT-CET आणि MPSC परीक्षांच्या पेपरफुटीवरून वाद सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकताच MPSC च्या ड्रग्स इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता थेट नामांकित पुणे विद्यापीठातूनच बोगस पदवी प्रमाणपत्र वितरीत केले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Chandrapur News : अनियमित पावसाचा फटका! चंद्रपुरात शेतीचे गणित बिघडले; खरीप पिकेही धोक्यात

Web Title: Second accused arrested in fake degree sale case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • pune news
  • Pune University

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या ‘त्या’ निर्णयावर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया
1

Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या ‘त्या’ निर्णयावर पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया

…तर सावर्जनिक जीवनातून निवृत्ती घेईन; दिलीप वळसे पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान
2

…तर सावर्जनिक जीवनातून निवृत्ती घेईन; दिलीप वळसे पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान

वन विभागाचे जिओ-टॅग्ड अ‍ॅप ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण; एका क्लिकवर 45 पर्यावरणपूरक पर्यटनस्थळे
3

वन विभागाचे जिओ-टॅग्ड अ‍ॅप ठरतेय पर्यटकांसाठी आकर्षण; एका क्लिकवर 45 पर्यावरणपूरक पर्यटनस्थळे

‘नो कॅप’ ते ‘रेड फ्लॅग’… पुण्यातही ‘जेन झी’ची डिजिटल भाषा सुपरहिट; कॉलेजच्या तरुणांच्या संवादात…
4

‘नो कॅप’ ते ‘रेड फ्लॅग’… पुण्यातही ‘जेन झी’ची डिजिटल भाषा सुपरहिट; कॉलेजच्या तरुणांच्या संवादात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.