
Delhi Bomb Blast: दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनाची पाहणी सुरू
दिल्लीतील भयानक स्फोटानंतर प्रत्येक ठिकाणी सुरक्षितता बाळगली जात असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिर्डीच्या प्रवेशद्वारावर देखील वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. जगप्रसिद्ध असलेल्या साईच्या शिर्डीत देखील सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ काल संध्याकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. या घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 24 जण जखमी झाल्याची माहिती आहे. धमाका इतका मोठा होता की परिसरातील सर्व गाड्या जळून खाल झाल्या. याशिवाय या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. लोकं मदीतीसाठी आवाज देत होते. सर्वत्र गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेचा परिणाम संपूर्ण भारतावर झाला. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.
बॉम्बस्फोनंतर संपूर्ण दिल्ली शहरात पोलीसांनी सुरक्षा वाढवली आहे. दिल्लीतील सर्व स्टेशनवर अलर्ट जारी करण्यात आला तसेच पोलिसांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली. प्रमुख स्थानकांवर रेल्वे सुरक्षा दल (RPF), सरकारी रेल्वे पोलिस (GRP) आणि श्वान पथके तैनात करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर प्रवाशांची तपासणी आणि गस्त देखील वाढविण्यात आली आहे.
अनेक शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नवी मुंबई, अशा ठिकाणींची सुरक्षा वाढवण्यात आली. याशिवाय पोलीस यंत्रणांनी या ठिकाणी तपास देखील सुरु केला. तसेच पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आणि साईंच्या शिर्डीत देखील सुरक्षा वाढवण्यात आली.