दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आज सोमवारी संध्याकाळच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ हा स्फोट झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, अग्निशमन विभागाला गाडीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हा स्फोट इतका तीव्र होता की मेट्रो स्टेशनच्या खिडक्या तुटल्या आणि आसपासच्या परिसरात असणाऱ्या गाड्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (फोटो सौजन्य - X)
Delhi Blast Photos: बॉम्बस्फोटानंतर हादरली दिल्ली, मेट्रोच्या खिडक्या तुटल्या, वाहनांचे तुकडे झाले... फोटो पाहून तुमचाही उडेल थरकाप

दिल्लीत झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की लाल किल्ल्याजवळील लाल मंदिरात गाडीचा एक भाग पडला. याशिवाय मंदिराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि मंदिराचे आरसे तुटले.

स्फोट होताच आसपासच्या परिसरातील दुकांना देखील आग लागल्याची सूचना देण्यात आली. या स्फोटात अनेक बस आणि गाड्यांना देखील आग लाग्याची माहिती मिळाली आहे.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटात सुमारे ८ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय या घटनेत सुमारे ३० लोकं जखमी झाली असल्याची माहिती आहे.

या स्फोटात ३० हून अधिक गाड्या जळून खाक झाल्या. हा धमाका इतका तीव्र होता की संपूर्ण परिसरात भूंकपासारखे कंपन निर्माण झाले.

या स्फोटानंतर रेल्वे संरक्षण दलाने चक्रधरपूर रेल्वे विभागांतर्गत टाटानगर, चक्रधरपूर, राउरकेला, झारसुगुडा आणि विभागातील इतर स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे .

चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या प्रमुख स्थानके, स्टेशन परिसर आणि स्टेशन पार्किंग क्षेत्रात पार्क केलेल्या संशयास्पद दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आरपीएफ कर्मचारी सखोल तपासणी करत आहेत.






