Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar : शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन; शेतकऱ्यांच्या थकीत पैशांसाठी पाठपुरावा

Sharad Pawar : कर्नाटकातील एपीएमसी व्यापाऱ्यांकडे अडकलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीच्या 2 कोटी 24 लाख रुपयांच्या थकीत पेमेंटसाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी त्यांनी फोनवरून चर्चा केली.

  • By विवेक
Updated On: Sep 13, 2026 | 09:28 PM
Sharad Pawa

Sharad Pawa

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्नाटकातील एपीएमसी व्यापाऱ्यांकडे 2 कोटी 24 लाख 95 हजार 121 रुपये थकीत.
  • शरद पवारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
  • थकीत रक्कम लवकर मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन शिवकुमार यांनी दिल्याची माहिती.
 

बारामती, प्रतिनिधी : कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे थकीत असलेले कांदा विक्रीचे तब्बल २ कोटी २४ लाख ९५ हजार १२१ रुपये मिळवून देण्यासाठी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट तातडीने मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली.

शिरूर तालुक्यातील तांदळी येथील शेतकरी नानासो बाबासो कळसकर, नवनाथ खशाबा थोरात, गोरख गणपत गदादे आणि गणेश गणपत गदादे यांचे कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे कांदा विक्रीचे २,२४,९५,१२१ रुपये इतके पेमेंट थकीत आहे. कांदा विक्री करूनही मोठी रक्कम अडकून पडल्याने संबंधित शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

प्रल्हाद वरे यांनी शरद पवार यांची घेतली भेट

शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन कृषिभूषण प्रल्हाद वरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे अडकलेले कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी पवार यांच्याकडे केली.

बारामती लोकअदालतीत 5627 प्रकरणे निकाली; 6.44 कोटींची मोठी वसुली

शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेत पवार यांनी तातडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे कर्नाटकातील एपीएमसीमधील व्यापाऱ्यांकडे थकीत असल्याची माहिती देत, संबंधित शेतकऱ्यांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळतील, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

मुख्यमंत्र्यांना पत्रही

या प्रकरणी पवार यांनी यापूर्वी झालेल्या भेटीदरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इंग्रजी भाषेत पत्र पाठविले होते. दरम्यान, नानासाहेब कळसकर व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांची बेंगळुरू येथील एपीएमसी मार्केटमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी भेट झाली. यावेळी कळसकर यांनी पवार यांनी पाठविलेले पत्र मुख्यमंत्र्यांना दाखविले.

पत्राची माहिती घेतल्यानंतर शिवकुमार यांनी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. तसेच महाराष्ट्रातून शरद पवार यांचा या प्रकरणासंदर्भात दूरध्वनी आल्याचेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

Baramati News : बारामतीच्या शाळांसाठी सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! पुणे जिल्ह्यातील 600 ZP शाळा होणार ‘मॉडेल स्कूल’

कांदा उत्पादनासाठी मोठा खर्च करून, प्रतिकूल परिस्थितीत मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांचे विक्री केलेल्या मालाचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट रखडणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे पवार यांच्या हस्तक्षेपानंतर या प्रकरणाला गती मिळण्याची शक्यता असून, संबंधित व्यापाऱ्यांकडून थकीत रक्कम लवकरच मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

“आमच्या कष्टाच्या पैशांसाठी पवार साहेबांनी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यामुळे आमचा प्रश्न आता मार्गी लागेल आणि थकीत कांदा पेमेंट लवकर मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे,” अशी भावना नानासाहेब कळसकर व त्यांच्या सहकारी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: Sharad pawar intervention karnataka onion payment maharashtra farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • dk shivkumar
  • Onion Issue
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्याची निवडणूक; युगेंद्र पवार पुन्हा बारामतीच्या मैदानात
1

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखान्याची निवडणूक; युगेंद्र पवार पुन्हा बारामतीच्या मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.