Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाविकांसाठी मोठी बातमी! ‘हे’ ज्योतिर्लिंग मंदिर राहणार तीन महिने बंद, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखडा मंजुर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 27, 2025 | 04:55 PM
भाविकांसाठी मोठी बातमी! 'हे' ज्योतिर्लिंग मंदिर राहणार तीन महिने बंद, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

भाविकांसाठी मोठी बातमी! 'हे' ज्योतिर्लिंग मंदिर राहणार तीन महिने बंद, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

पुढील तीन महिन्यासाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद
महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद
भाविकांनी सहकारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाच्या बांधकाम तसेच भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा कालावधी वगळून भाविकांना दर्शनाकरिता बंद करण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर संस्थानने घेतला आहे, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी केले आहे.

राज्य शासनाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखडा मंजुर केला आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी तसेच प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व श्री. भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठकीत सर्वाच्या सहमतीने मंदिर ९ जानेवारीपासून पुढे तीन महिन्यासाठी (महाशिवरात्रीचा १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ हा कालावधी वगळून) तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि भाविकांच्या सोयी करिता महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये मंदिर दर्शनाकरिता खुले राहणार आहे.

सन २०२७ मध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे, त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणारे लाखो भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणाची कामे वेळेत पूर्ण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्यासोबतच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद करण्यात येणार आहे.

Pune News: भीमाशंकरला जाणे सोपे होणार; ‘या’ रस्त्याचे काम प्रगतीपथावर, लवकरच…

मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत सुरू राहतील. थेट दर्शन बंद या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष दर्शन सेवा उपलब्ध राहणार नाही. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

“श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतलेला असून भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करावे,” असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डूड्डी यांनी केले आहे.

Web Title: Shri kshetra bhimashankar temple closed three months ias jitendra dudi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 04:51 PM

Topics:  

  • bhimashankar
  • pune news
  • temple

संबंधित बातम्या

‘नेकी का काम आंदेकर का…’; पुणे तिथे काय उणे! कुख्यात गुंड आंदेकरने जयघोषात भरला उमेदवारी अर्ज
1

‘नेकी का काम आंदेकर का…’; पुणे तिथे काय उणे! कुख्यात गुंड आंदेकरने जयघोषात भरला उमेदवारी अर्ज

ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरुच; पुण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
2

ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरुच; पुण्यातील बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

आता याला काय म्हणावं? लग्नाच्या अवघ्या 24 तासांत घटस्फोट; कारण काय तर…
3

आता याला काय म्हणावं? लग्नाच्या अवघ्या 24 तासांत घटस्फोट; कारण काय तर…

अजब-गजब! जपानमधील अनोखं मंदिर जिथे लोक टक्कल पडू नये म्हणून केस अर्पण करतात
4

अजब-गजब! जपानमधील अनोखं मंदिर जिथे लोक टक्कल पडू नये म्हणून केस अर्पण करतात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.