भीमाशंकर रस्त्याचे काम प्रगतीपथावर (फोटो- सोशल मीडिया)
दरम्यान, भीमाशंकरला जाण्यासाठी सर्व वहातुक मंचर घोडेगाव, डिंभा तळेघर मार्गे श्री क्षेत्र भीमाशंकरकडे होते. येथे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी मार्ग नसल्यामुळे या रस्त्याचे महत्व अधिक आहे. गेल्या सहा़़-सात महिन्यांपासून सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. उन्हाळ्यातील सुट्टीची गर्दी तसेच पावसाळ्यामुळे निसर्ग सौंदर्य वाढल्याने पर्यटकांची गर्दी कमी झाली असली तरी ती श्रावण महिन्यात वाढली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता या रस्त्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. रस्ता चांगला होण्यासाठी अधिकारी वर्ग जागरूक असल्याचे अधिक्षक अभियंता डी.बी. विभूते यांनी सांगितले.
सदर रस्त्याला सुमारे ३ कोटी ५० लाख रूपये खर्च होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने भाविक आणि स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन रस्त्याचे काम चांगल्या प्रकारचे करण्यासाठी ठकेदाराला सूचनाही दिल्या आहेत. राज्याचे माजी सहकार मंत्री िदलीप वळसे पाटील यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या मंचर भीमाशंकर रस्त्यावरील तळेघर ते िनगडाळे या रस्त्याच्या दुरूस्ती करिता साडे तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. स्वत: वळसे पाटील यांनी या रस्त्याचे काम चांगले होण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यानुसार रस्त्याचे काम आता चांगल्या प्रकारे प्रगती पथावर आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रृती नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता प्रेरणा कोटकर यांच्या देखरेखी खाली निगडाळे ते तळेघर रस्त्याचे काम चालू आहे. सध्या या रस्त्यावर बीएमकरण चालू असून त्यावर आणखी एक लेयर घेतला जाईल. पहिल्या लेयरला जरी खड्डे पडले असले तरी दुसऱ्या लेयरमुळे ते व्यवस्थित होतील असे उपअभियंता कोटकर यांनी सांगितले.






