पुणे: शहरामध्ये पाणी टंचाईमुळे एखाद्या मोठ्या भागात एक दिवस संपूर्णपणे पाणी पुरवठा बंद केला पाणीपुरवठा तर दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये किंवा नळ कोंडाळ्यांवर गळतीमुळे सतत वाहणारे पाणी अशी विषम परिस्थिती दिसून येते. पुणे शहरामध्ये मध्यवर्ती भागामध्ये अनेक स्वच्छता गृहांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. बेसिनसह नळ बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा स्वच्छतेसाठी वापर होतो.
संडास आणि मुताऱ्यांमध्ये पूर्वीचा नळजोड आहे. अनेक स्वच्छता गृहांतील नळ तोडण्यात आले आहेत किंवा चोरीस गेले आहेत. त्यामुळे २४ तास पाणी वाहून जाऊन नासाडी होते. भवानी पेठेत बुरुड पुलाजवळील नककोंडाळ्यातून पाणी वाया जाताना मंगळवारी दिसून आले. अनेक सार्वजनिक मंडळे आणि छोटी देवळे याठिकाणी नळांची खैरात करण्यात आली होती. काही व्यावसायिकांनी चोरून पाणी जोड घेतले आहेत. अशा ठिकाणी पथारीवाले, स्टाॅलवाले किंवा छोटे पाणी भरून नेताना दिसतात. सदाशिव पेठेतील खुन्या मुरलीधर जवळ हे चित्र आहे. दरम्यान, मैलापाणी शुध्दीकरण केलेल्या किंवा बोअरच्या पाण्याचा वापर स्वच्छता गृहांत करण्याचा अनेक वर्षांपूर्वीचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयत्न फसला असून बेहिशोबी पाणी नाश होतो आहे.
Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले
पाणीकपातीबाबत त्वरीत निर्णय घ्यावा
आमदार भीमराव तापकीर यांच्या समवेत माजी नगरसेवक बाळासाहेब नवले यांनी आज पुणे महापालिका येथे पालिका आयुक्तांची भेट घेतली. दक्षिण पुणे भागात अचानकपणे लादण्यात आलेल्या या अन्यायकारक पाणी कपात निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना, विशेषतः गृहिणींना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याने याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा ही भूमिका तापकीर यांनी मांडली.
पुण्यात पाण्याची मागणी वाढली
वाढत्या उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रासले आहेत. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवक तसेच राजकीय नेते थेट तक्रारी घेत तसेच स्थानिक नागरिकांसह पाणीपुरवठा विभागावर मोर्चा घेवून जात आहेत. त्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जात असून वाढीव २ एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरु केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
कमी दाबाने पाणी येत आहे, उशिरा पाणी येत आहे, जलवाहिनी फुटली आहे, वॉलमन पाणी कमी दाबाने सोडतो, अशा प्रकारांच्या तक्रारी देणारे फोन दररोज महापालिकेत येत आहेत. तक्रार देवूनही तसेच पाठपुरावा करुन देखिल पाणी येत नसल्याने थेट पाणीपुरवठा विभागात येवून प्रमुखांना घेराव घातला जात आहे.