मराठवाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ठप्प पडले (फोटो - सोशल मीडिया)
Nanded News : नांदेड : स्पर्धा परीक्षांची तयारी म्हणजे अनेक युवकांच्या व विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा टप्पा. परंतु महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडून दिले जाणारे बैंक, रेल्वे, एलआयसी आदी परीक्षांचे प्रशिक्षण गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असल्याने मराठवाड्यातील ओबीसी विद्यार्थ्यांची स्वप्ने अक्षरशः ‘स्क्रीन’वर अडकून पडली आहेत. यापूर्वी खासगी शिकवणी संस्थांच्या माध्यमातून ऑफलाइन प्रशिक्षण दिले जात होते.(Nanded News)
अभ्यासिका, मार्गदर्शक प्राध्यापक, शंका निरसन सत्रे यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेची दिशा मिळता होती. मात्र यावर्षीपासून प्रशिक्षण पूर्णपणे ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘डिजिटल’ सोयींचा दाखला देत हा बदल करण्यात आला असला, तरी ग्रामीण भागातील वास्तव वेगळे आहे. इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था आणि मोबाईल डेटाचा खर्च यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात सातत्य ठेवणे कठीण जात आहे. ओबीसी संघटनांनी प्रशासनाच्या अनास्थेवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
हे देखील वाचा : ब्रिटनच्या निवडणुकीत PM मोदींच्या फोटोवरून राडा; ‘ग्रीन पार्टी’वर गंभीर आरोप; हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रयत्न?
मुख्यमंत्र्यांना दिले पत्र
सकल ओबीसी महामौर्चाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहून तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ‘ही योजना ओबीसी विद्याथ्यर्थ्यांसाठी संधीचा पूल आहे: तोच प प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कोसळत आहे, असा आर संघटनांकडून करण्यात आला आहे. प्रशिक्षण ऑफलाइन स्वरूपात आणि पूर्ण विद्यावेतनास तातडीने सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, ‘महाज्योती’ प्रशासनाने एसएससी व इतर परीक्ष प्रशिक्षण सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. बैंक व रेल्वे भरतीच्या पूर्वपरीक्षा मार्चमध्ये होत असून एप्रिलपासू प्रशिक्षण सुरू होईल, असे सांगण्यात आले. आधुनिक सौयी आणि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाइ पद्धतीचा अवलंब केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
तथापि, एका विद्यार्थ्यांवर ऑनलाइन प्रशिक्षणासाठी सुमारे ७हजार रुपयांचा खर्च प्रस्तावित असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हे देखील वाचा : प्रदूषणाशी लढा! मेट्रो प्रवासातून दर किलोमीटरला वाचतोय १०८.५ मिलीग्रॅम $CO_2$
इतका खर्च का ?
‘युट्यूब’ व इतर अॅपवर मोफत सामग्री उपलब्ध असताना इतका खर्च का? असा सवालही उपस्थित होत आहे. मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ही योजना केवळ प्रशिक्षण नसून सामाजिक उन्नतीची संधी आहे. प्रशासनाने डिजिटल निर्णय घेताना भौगोलिक आणि सामाजिक वास्तवाचा विचार करणे गरजेचे आहे. अन्यथा, स्क्रीनवरील वर्ग सुरू राहतील; पण अनेकांच्या होणार नाही. आयुष्याचा ‘लॉग-इन’ मात्र होणार नाही.
झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करा
सोमवारी परभणी जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळपिके इत्यादींचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी आमदार राजेश विटेकर व आमदार रत्नाकरराव गुट्टे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मांडली होती. जिल्ह्यातील सोनपेठ, पाथरी, मानवत, परभणी पूर्णा, पालम, गंगाखेड, तालुक्यातील अनेक भागात पिकांचे नुकसान झाले असल्याचे आमदार विटेकर या व आमदार गुट्टे यांनी त्या लक्षवेधी सूचनामध्ये म्हटले होते. परभणी जिल्ह्याप्रमाणेच महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व जिल्ह्यातील प्रशासनास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून दिले जातील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली.






