Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाहीर, आता नवीन तारीख…

राज्यातील शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकूण ९६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2026 | 12:44 PM
अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाही

अकरावी विशेष प्रवेश फेरीसाठी मुदतवाढ; सुधारित वेळापत्रकही जाही

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या विशेष फेरीसाठी प्रवेश निश्चित करण्याची मुदत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील अतिवृष्टीमुळे ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. या तीन जिल्ह्यांतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

राज्यातील शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकूण ९६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत १४ लाख ७३ हजार ४२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ९ लाख ७५ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या विशेष फेरीसाठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ (नोंदणी) आणि भाग-२ (महाविद्यालय पसंतीक्रम) अंतिम केले होते. त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना ३ जुलै रोजी महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले.

४ जुलैपर्यंत १ लाख ९७ हजार ३८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यामध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून १ लाख ८९ हजार ६५९, तर इन-हाऊस, व्यवस्थापन व अल्पसंख्याक कोट्यांतून ७ हजार ७२२ प्रवेश निश्चित झाले आहेत. पूर्वी प्रवेश निश्चित करण्यासाठी ३ जुलै दुपारी ४ ते ६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे विद्यार्थी आणि पालकांना अडचणी निर्माण झाल्याने ही मुदत ७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.

कार्यवाही मुदतीत पूर्ण करावी

या कालावधीत विद्यार्थ्यांनी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा. संबंधित महाविद्यालयांनीही प्रवेशाची पुष्टी, नकार अथवा रद्द करण्याची कार्यवाही याच मुदतीत पूर्ण करावी.

सुधारित वेळापत्रक

सुधारित वेळापत्रकानुसार ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. ८ जुलैपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांशी संबंधित डेटा प्रक्रिया करण्यात येणार असून, ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

RRB Board News : रेल्वे ग्रुप-डी परीक्षेची तारीख जाहीर! २२ हजार जागांच्या मेगाभरतीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती गुणांची गरज असेल?

Web Title: Deadline extended for class 11 special admission round revised schedule also announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • 11th Admission
  • Education Department
  • Maharashtra Education

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.