राज्यातील पहिली हायड्रोजन बस पुण्यात धावणार
बस लवकरच पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट होणार
हायड्रोजन बसची ट्रायल रन यशस्वी
पुणे: राज्यातील पहिल्या हायड्रोजन बसची ट्रायल रन पुण्यात यशस्वीरीत्या पार पडली. ही बस लवकरच पीएमपीच्या ताफ्यात समाविष्ट करून पुणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. ही ट्रायल रन औंध येथील महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) कार्यालयापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि पुन्हा मेडा कार्यालयापर्यंत घेण्यात आली.
मेडाचे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग म्हणाले, महाराष्ट्र सरकारने ग्रीन एनर्जी धोरण जाहीर केले असून मेडा ही त्याची नोडल एजन्सी आहे. पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पुढाकार आहे. राज्य सरकारकडून या बस खरेदीसाठी ३० टक्के अनुदान मिळत आहे. टाटा मोटर्सद्वारे तयार करण्यात आलेल्या या बसची किंमत अडीच ते तीन कोटी रुपये असून अनुदानामुळे ती सुमारे दोन कोटी रुपयांत मिळणार आहे.हायड्रोजन बसमुळे वायूप्रदूषण शून्यावर आणण्यास मदत होणार असून पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल. ही बस हरित ऊर्जा धोरणाला गती देणारी ठरणार आहे.
हायड्रोजन बसची ट्रायल रन मेडा, पीएमपीएमएल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली आहे. पुढील सात दिवस सात वेगवेगळ्या मार्गांवर या बसची चाचणी होणार आहे. ट्रायल रननंतर संचालक मंडळाच्या बैठकीत बस खरेदीचा प्रस्ताव मांडण्यात येईल आणि मंजुरी मिळाल्यानंतर बस पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल.
पंकज देवरे,
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,पीएमपीएमएल
हायड्रोजन बसची ट्रायल झाली त्यावेळेस पीएमपीचे अध्यक्ष पंकज देवरे, मेडाचे प्रकल्प महाव्यवस्थापक आनंद रायदुर्ग, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे डॉ.आशिष लेले, सीआयआरटीचे संचालक देवेंद्र सिंग, इंडियन ऑईलचे आलोक सिंग, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुजीत डोंगरजाळ, पीएमपीचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे, वाहतूक अधिकारी नारायण करडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Pune News: मोठी बातमी! ‘PMP’ चालकांनो सावधान; ‘हे’ कृत्य केल्यास होणार थेट निलंबनाची कारवाई
‘PMP’ चालकांनो सावधान
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तसेच खाजगी बस पुरवठादारांच्या चालक सेवकांसाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा संचालक पीएमपीएमएल यांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालकांनी ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास थेट निलंबन करण्यात येणार आहे. काही चालक मोबाईल आणि हेडफोनचा वापर करताना आढळले आहेत. एवढेच नव्हे, तर एका बस चालक मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.