पीएमपीएमएल बस सेवा (pmpml)
पुणे महानगर परिवहन महामंडळाने लागू केले नवीन नियम
बस चालक मोबाईलवर बोलत असताना झाला होता अपघात
पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तसेच खाजगी बस पुरवठादारांच्या चालक सेवकांसाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवे कडक नियम लागू करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा संचालक पीएमपीएमएल यांनी ४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत चालकांनी ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरल्यास थेट निलंबन करण्यात येणार आहे. काही चालक मोबाईल आणि हेडफोनचा वापर करताना आढळले आहेत. एवढेच नव्हे, तर एका बस चालक मोबाईलवर बोलत असताना अपघात झाल्याची घटना पुढे आली आहे. या घटनेनंतर पीएमपीएमएलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चालकांसाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत
चालक सेवकांनी ड्युटीवर जाण्यापूर्वी स्वतःकडील मोबाईल फोन त्या शेड्युलवरील वाहक सेवकाकडे जमा करणे बंधनकारक राहील.
ड्युटी संपल्यानंतर वाहकाकडून मोबाईल फोन परत करण्यात येईल.
चालक सेवक ड्युटीवर असताना मोबाईल,हेडफोन वापरताना आढळल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालकावर तत्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल.
आगार व्यवस्थापकांनी आपल्या आगारातील खाजगी बस पुरवठादारांनाही या सूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
आता तुम्हाला घरबसल्या काढता येणार ‘PMP’चे तिकीट
पीएमपी प्रवाशांना अॅपवरून तिकीट काढण्याच्या सेवेबरोबरच आणखी दोन ऑनलाइन तिकीट काढण्याचे पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने सुचवलेल्या दोन कंपन्यांनी पीएमपीसाठी ऑनलाइन तिकीट व बस ट्रॅकिंग यंत्रणा तयार केली आहे. सुरूवातीला पीएमपी बसचे लाइव्ह लोकेशन दिसणारी यंत्रणा गुगलसोबत विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. पण काही तांत्रिंक अडचणींमुळे हे काम होऊ शकले नाही. त्यानंतर पीएमपीने स्वत: प्रवाशांच्या सोयीसाठी अॅप बनवले आहे. अॅपच्या माध्यमातून या बसची ‘रिअल टाइम’ माहिती दिली जाणार आहे.
पुणेकरांनो आता तुम्हाला घरबसल्या काढता येणार ‘PMP’चे तिकीट; प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पीएमपी अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना ज्या बसने प्रवास करायचा आहे, त्या बसची माहिती घरबसल्या पाहता येणार आहे. सोबतच तिकीटही काढता येणार आहे. ज्या प्रवाशांनी घरबसल्या तिकीट काढले आहे, त्यांनी प्रवास करता वाहकाला क्युआर कोड दाखवल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल. या अॅपवर सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या अॅपवर पीएमपीच्या सर्व मार्गांची माहितीही मिळणार आहे.