पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर(संग्रहित फोटो)
पुणे : शहरात सोमवारी पावसाने हजेरी लावल्यानंतर मंगळवारी पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. सकाळी अंशतः ढगाळ वातावरण होते; मात्र दुपारनंतर उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यातही वाढ झाली. शहरातील कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यातच बुधवारी (दि.30) तापमानाचा पारा 31 अंशांवर पोहोचला असून, पुन्हा उकाडा जाणवत आहे.
पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कमी असून, तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. शहर आणि परिसरात मंगळवारी सकाळपासून आकाश अंशतः ढगाळ होते. दुपारनंतर मात्र ढग दूर होत उन्हाचा चटका जाणवू लागला. पावसाने विश्रांती घेतल्याने वातावरणातील उकाडाही वाढला. पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्याने कमाल तसेच किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी (ता. ३०) सकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे.
बुधवारी दुपारनंतर आणि सायंकाळी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, शहराच्या काही भागांत हलक्या सरी पडू शकतात. या दिवशी कमाल तापमान ३३ अंश, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. मात्र, सध्या पुण्यातील तापमानाचा पारा 31 अंशांवर गेल्याचे दिसून आले आहे.
गुरुवारी कसे असेल हवामान?
गुरुवारी (ता. १) आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर आणि सायंकाळी अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. त्यानंतरही पावसाची शक्यता कमी राहणार असल्याने शहरात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.
Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ
पावसाळ्याचे दिवस असूनही पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यासह पातूर तालुक्यात सध्या तीव्र उन्हाच्या चटक्यासह असह्य उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आकाशात अधूनमधून ढग दाटून येत असले, तरी पाऊस पडण्याऐवजी उन्हाचा कडाका वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यातच नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’ चा दाहक अनुभव येत आहे.
अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…






