
दररोज 10 ते 11 लाख लोकांचा पीएमपीमधून प्रवास
ऑनलाइन तिकीट काढण्याकडे लोकांचा कल
पीएमपीची पुण्याची लाईफलाइन म्हणून ओळख
पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ने साधारणता दररोज दहा ते अकरा लाख प्रवासी प्रवास करतात.यात मोबाईल ॲप,आणि स्कॅनरच्या माध्यमातून दररोज १ लाख १० हजार प्रवाशी ऑनलाईन तिकिट काढत आहेत. यावरून ऑनलाईन तिकिट काढण्याचा प्रवाशांचा कल हा वाढलेला दिसून येतो.
जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात ४ कोटी ७ लाख ३० हजार प्रवाशांनी ऑनलाईन तिकिट काढले आहेत.या माध्यमातून ८६ कोटी ८० लाख ७६ हजार रूपये ऑनलाईन स्वरूपात उत्पन्न मिळाले आहे. ऑनलाईन तिकीट काढणे सुलभ झाल्यामुळे प्रवाशांचा कल ऑनलाईन कडे वाढला आहे.तसेच वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्टे पैशावरून होणारे वाद देखील या ऑनलाईन तिकीट प्रणालीमुळे कमी झाले आहेत.
पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट; डिसेंबर महिन्यात PMP च्या पर्यटन…
ऑनलाईन तिकीट मोबाईल ॲप,आणि मशीन स्कॅनच्या माध्यमातून काढणे सुलभ झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचा कल हा ऑनलाईन तिकीट काढण्याकडे वाढत असल्याचे दिसून येते. सुट्टे पैशामुळे येणाऱ्या अडचणी देखील कमी होत आहेत.त्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा.
किशोर चौहान,
जनसंपर्क अधिकारी,पीएमपी
ऑनलाईन तिकिट आणि त्यातून मिळालेले उत्पन्न
महिना प्रवाशी उत्पन्न
जानेवारी ३१,३७,२९९ ५,३८,८९,७४६
फेब्रुवारी ३०,४९,०१५ ५,१८,०६,८६९
मार्च ३५,१८,७१४ ५,९५,९४,४०२
एप्रिल ३६,४३,७९४ ६,११,८२,८५७
मे ३५,८४,६९५ ६,०३,२३,१८६
जुन ३०,३८,१६४ ७,६२,६४,३७८
जूलै ३८,११,६६१ ९,४०,५५,६१२
ऑगस्ट ३५,७४,४९१ ८,७९,४९,२६०
सप्टेंबर ३५,६०,०५९ ८,५७,४७,८२७
ऑक्टोबर ३०,९५,००३ ७,५१,६३,७६२
नोव्हेंबर ३३,४२,३३३ ८,०९,०५,३२०
डिसेंबर ३३,७४,७९७ ८,११,९३,२४०
एकूण ४,०७,३०,०२५ ८६,८०,७६,४६०
Pune News: ‘PMP’मध्ये प्रवाशांच्या तक्रारीचा पाऊस; ३४ हजार ८४३ तक्रारी; चालक व वाहनांसंदर्भात…
पुण्यात फिरायला येताय? मग ‘या’ ठिकाणांना आवर्जून द्या भेट
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) च्या पर्यटन बसला डिसेंबर महिन्यात पीएमपीच्या पर्यटन बसला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पुणे पर्यटन बसच्या माध्यमातून मागील तीन माहिन्यात ३ हजार ४०४ पर्यटकांनी लोणावळा आणि पानशेत वरसगाव या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. पीएमपीच्या या पर्यटन बसला दिवसेंदिवस मागणी वाढताना दिसत आहे. पर्यटकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पीएमपीला १६ लाख ७२ हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या हिवाळयाचे ऋतू असल्यामुळे पर्यटक लोणावळा आणि पानसेत वरसगाव या भागात जास्त मागणी असल्याची माहिती पर्यटन बस समन्वयक नितीन गुरव यांनी दिली आहे. पर्यटकांना पर्यटण करण्यासाठी पीएमपीच्या बसमधून सुरक्षित प्रवास असतो.म्हणून दिससेंदिवस पर्यटण बसला मागणी वाढत आहे. जास्तीत जास्त पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.