Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rupehrakha Dhore passes away : मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन; मावळ तालुक्यावर पसरली शोककळा

Rupehrakha Dhore : मावळच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा खंडेराव ढोरे यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले.रुपलेखा ढोरे या पुणे शहराचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांची कन्या होत्या. 

  • By प्रीति माने
Updated On: Jan 29, 2026 | 02:03 PM
first woman MLA from Maval Rupalekha Dhore has passed away maval political news

first woman MLA from Maval Rupalekha Dhore has passed away maval political news

Follow Us
Close
Follow Us:
  • माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे निधन
  • याच्या ७६व्या वर्षी झाले निधन
  • पुणे शहराचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांची कन्या
Rupehrakha Dhore passes away : वडगाव मावळ : सतिश गाडे : मावळ विधानसभेच्या प्रथम महिला आमदार रुपलेखा खंडेराव (दादासाहेब) ढोरे यांचे वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. ढोरे यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ व उल्लेखनीय राहिली आहे. रुपलेखा ढोरे या पुणे शहराचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांची कन्या होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या भारतीय जनता किसान मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज (भाऊ) ढोरे व उद्योजक सचिन (बाळा) ढोरे यांच्या मातोश्री होत. मावळ पंचायत समितीचे दिवंगत माजी सभापती दादासाहेब ढोरे यांच्या त्या पत्नी, तर पुणे शहराचे प्रथम महापौर बाबुराव सणस यांच्या त्या कन्या होत्या.

पहिल्या महिला आमदार होण्याचा मान

मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या प्रथम महिला उमेदवार म्हणून त्यांनी सन १९९५ ची विधानसभा निवडणूक लढवली. तत्कालीन राज्यमंत्री मदन बाफना यांचा पराभव करत त्या मावळच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी राज्यात भाजप–शिवसेना युतीचे सरकार असून मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या समवेत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

हे देखील वाचा : अजित पवारांना अखेरचा निरोप! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल

आमदार रुपलेखा ढोरे यांचा राजकीय प्रवास

रुपलेखा ढोरे यांनी १९९२ साली तत्कालीन वडगाव–इंदोरी जिल्हा परिषद मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्याच काळात पंचायत समितीमध्ये काँग्रेस व भाजपचे समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठ्या टाकून उपसभापतिपदाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत त्या विजयी ठरल्या आणि तीन वर्षे उपसभापती म्हणून कार्यभार सांभाळला. तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्ष, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या वडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या स्कूल कमिटीच्या चेअरमन म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. नंतर त्या नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या सल्लागार मंडळावर कार्यरत होत्या.

हे देखील वाचा : कोकणच्या मदतीला धावणारे कार्यक्षम नेतृत्व हरपले; अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

विकासकामांचा ठसा

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्या आमदार झाल्या. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तालुक्यात ५५ नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. मावळ तालुका टँकरमुक्त करण्यात आला. तसेच मंगरूळ येथील आंद्रा धरणाच्या कामालाही त्यांच्या कार्यकाळात सुरुवात झाली. मावळच्या विकासात त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

Web Title: First woman mla from maval rupalekha dhore has passed away maval political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • maval news
  • Maval Politics
  • pune news

संबंधित बातम्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार
1

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी; मावळात ३७ जणांनी घेतली माघार

पुण्यात बँक कर्मचारी आक्रमक, जोरदार निदर्शने; नेमकं मागण्या काय?
2

पुण्यात बँक कर्मचारी आक्रमक, जोरदार निदर्शने; नेमकं मागण्या काय?

Deepti Magar Case : पुण्यात आणखी एक वैष्णवी हगवणे? रुपाली चाकणकरांनी घेतली पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट
3

Deepti Magar Case : पुण्यात आणखी एक वैष्णवी हगवणे? रुपाली चाकणकरांनी घेतली पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट

पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय
4

पत्नीचा वैयक्तिक निर्वाह भत्त्याचा दावा फेटाळला; पुणे कुटुंब न्यायालयाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.