Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पीएमआरडीए’चा वाहतूककोंडीवर सर्जिकल स्ट्राईक; 45 कोटी खर्चून 17 चौकांचा होणार कायापालट

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील उपनगरांमध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे निर्माण झालेली जीवघेणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 22, 2026 | 05:12 PM
PMRDA UDCPR Implemented, Pune Metro Region Construction Rules

PMRDA UDCPR Implemented, Pune Metro Region Construction Rules

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील उपनगरांमध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि नागरीकरणामुळे निर्माण झालेली जीवघेणी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. ‘पीएमआरडीए’च्या ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात अत्यंत वर्दळीच्या १७ प्रमुख चौकांची (जंक्शन्स) वैज्ञानिक पद्धतीने पुनर्रचना करण्यात येणार आहे. या संपूर्ण ‘जंक्शन इम्प्रूव्हमेंट’ प्रकल्पासाठी सुमारे ४५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

गेल्या काही वर्षांत तळेगाव, चाकण, शिक्रापूर, लोणीकंद, पिरंगुट आणि सासवड या भागांत निवासी आणि औद्योगिक वसाहतींचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या लाखांनी वाढली, मात्र चौकांची भौगोलिक रचना जुनीच असल्याने तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. हीच तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने पावले टाकली आहेत.

या १७ चौकांच्या सविस्तर भौगोलिक आणि वाहतूक रचनेचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार संस्था (कन्सल्टंट एजन्सी) नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, सध्या तांत्रिक सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे. सुरुवातीला काही चौकांमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’ म्हणून प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू केले जाईल, त्यानंतर उर्वरित चौकांमध्ये हा बदल केला जाणार आहे.

प्रकल्पांतर्गत होणारे प्रमुख तांत्रिक बदल खालीलप्रमाणे आहेत.

केवळ वरवरचे सौंदर्याकरण न करता, चौकांचे तांत्रिक आणि वैज्ञानिक पद्धतीने पुनर्गठन केले जाणार आहे. यात खालील गोष्टींचा समावेश असेल.

स्वतंत्र मार्गिका : चौकात वाहने अडकू नयेत म्हणून रस्त्यांचे रुंदीकरण करून डाव्या व उजव्या वळणासाठी स्वतंत्र मार्गिका केल्या जातील.

हाय-टेक सिग्नल यंत्रणा : वाहतुकीच्या घनतेनुसार ऑटोमॅटिक पद्धतीने चालणारे सिग्नल बसवले जातील.

पादचारी सुरक्षा : पादचाऱ्यांसाठी प्रशस्त फूटपाथ, झेब्रा क्रॉसिंग आणि स्पष्ट रोड मार्किंग केले जाईल.

माहिती फलक : वाहनचालकांच्या सुविधेसाठी चौकाच्या आधीच मोठे मार्गदर्शक आणि माहिती फलक लावले जातील.

‘पीएमआरडीए’च्या अधिकृत आराखड्यानुसार सुधारणा करण्यात येणाऱ्या चौकांची यादी खालीलप्रमाणे आहे.

‘या’ १७ चौकांचे भाग्य बदलणार

१. कान्हे फाटा (पुणे-मुंबई महामार्ग परिसर)

२. तळेगाव एस.एच. ५५ (राज्य महामार्ग ५५)

३. कोरेगांव भीमा (पुणे-अहमदनगर रस्ता)

४. डोणजे फाटा (सिंहगड रस्ता परिसर)

५. गोलेवाडी चौक (डोणजे)

६. पेरणे फाटा (पुणे-अहमदनगर रस्ता)

७. लोणीकंद फाटा (पुणे-नगर रस्ता परिसर)

८. केसनंद फाटा (वाघोली-केसनंद रस्ता)

९. शिक्रापूर चौक (पुणे-नगर रस्ता)

१०. सिंबायोसिस चौक (लवळे)

११. नांदे चौक (मुळशी/बाणेर-म्हाळुंगे परिसर)

१२. थेऊर फाटा (पुणे-सोलापूर महामार्ग जोडणारा रस्ता)

१३. पिरंगुट चौक (पुणे-पौड रस्ता)

१४. गोडांबेवाडी

१५. सासवड चौक (हडपसर-सासवड रस्ता)

१६. केसनंद गाव चौक

१७. वढू बुद्रुक चौक (शिरूर तालुका परिसर)

वार्षिक अर्थसंकल्पातून बळ!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच मंजूर झालेल्या ‘पीएमआरडीए’च्या सुमारे ४,६२९ कोटी रुपयांच्या वार्षिक अर्थसंकल्पात सर्वाधिक २,९१८ कोटी रुपयांची तरतूद अभियांत्रिकी विभागासाठी करण्यात आली आहे. या निधीमुळे जंक्शन इम्प्रूव्हमेंट प्रकल्पासह रिंग रोड, पुणे मेट्रो लाईन-३ च्या कामाला मोठी गती मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : दक्षिण पुण्यात वारंवार वीज खंडित, नागरिक संतप्त; महावितरणविरोधात रोष

चाकणचा या प्रकल्पात समावेश का नाही?

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण चौक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावरील कोंडीमुळे नुकताच उद्योजक व नागरिकांनी ‘पीएमआरडीए’वर मोर्चा काढला होता. मात्र, कामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या ४५ कोटींच्या योजनेत चाकणचा समावेश करण्यात आलेला नाही. चाकणमधील कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि स्थानिक प्रशासन स्वतंत्रपणे काम करत आहे. तसेच चाकण परिसरातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून १९६ कोटी ५० लाखांच्या निधीला मंजुरी दिली असून, एकूण ५५८ कोटींच्या रस्ते विकास कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याशिवाय, नाशिक फाटा ते खेड दरम्यान स्वतंत्र एलिव्हेटेड कॉरिडॉरचे कामही नियोजित आहे.

Web Title: The administration is making efforts to reduce traffic congestion within the pmrda limits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • PMRDA
  • pune news
  • Pune Traffic

संबंधित बातम्या

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
1

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
2

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
3

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
4

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.