
The book launch ceremony of 'Comprehensive Ethics' written by Ashish Jaitpal Pune News.
यावेळी मार्गीचे संचालक प्रवीण चव्हाण,मैत्रेय अकॅडमीचे संचालक डॉ.आशिष जैतपाळ, अभ्यास मंडळचे संदीप जाधव, सिध्दार्थ क्षीरसागर,कृषी संचालक विशाल भोग,राष्ट्रवादीचे सचिव अशोक बेदारे,सुशील आहेरराव,मंगेश कुलकर्णी,अजित देशमुख,प्राचार्य राजाभाऊ ढोंग, दीप्ती नायर, योगेश देवकर आदी उपस्थित होते. प्रस्तावना डॉ.आशिष जैतपाळ यांनी केले.
हे देखील वाचा : E-governance reforms winner : ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात कोण ठरले नंबर वन? CM फडणवीसांनी केली यादी जाहीर
यावेळी डॉ.शिसवे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी स्वत:शी प्रामाणिक राहीले पाहिजे, हा संकल्प देखील खूप उर्जा देत असतो. नीतिशास्त्राचे हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांनी नव्हे,तर प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे आहे. विशेषत: स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक प्रेरणा देणारे आहे.ज्या वेळी विद्यार्थी अधिकारी झाल्यावर काही तरी बदल करील असे ठरवतो आणि जिद्दीने पेटून उठतो तेव्हाच यश मिळवण्याची शक्यता जास्त असते.प्रशासकीय सेवेत आल्यानंतर काही आव्हानात्मक क्षण येतात.त्यावेळी न डगमगत सामोरे जाता आले पाहिजे.यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी तयार असावे.” असे मत डॉ.रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : Republic Day 2026 : महाराष्ट्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा…! CM फडणवीसांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
तसेच प्रवीण चव्हाण म्हणाले की, “आपले ध्येय नेहमी मोठे असावे. जो स्वत:शी प्रामाणिक असतो त्यांच्या मागे सर्व जण येत असतात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पॅशन असावे त्याशिवाय यश मिळवता येत नाही. स्वत: पुस्तके वाचून ज्यावेळी नोट्स काढतो त्यावेळी अभ्यास हा परिपूर्ण होत असतो. संधी मिळेल तिथे बोलता आले तर पर्यायाने एमपीएससी,यूपीएससीच्या पूर्व,मुख्य,आणि मुलाखतीसाठी आत्मविश्वासाने सामोरे जाता येते, असा विश्वास प्रवीण चव्हाण यांनी व्यक्त केला. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा जैतपाळ यांनी केले. तर आभार नितीन माळवदे यांनी मानले.