Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP Election : निवडणूक प्रचाराची जिल्हाभरात उडाली राळ; जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर रविवारी (दि. २५) संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2026 | 01:50 PM
निवडणूक प्रचाराची जिल्हाभरात उडाली राळ; जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी

निवडणूक प्रचाराची जिल्हाभरात उडाली राळ; जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक प्रचाराची जिल्हाभरात उडाली राळ
  • जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी
  • प्रचाराच्या सुरुवातीलाच आरोप-प्रत्यारोपांची फैरी
पुणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर रविवारी (दि. २५) संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. रविवारची सुट्टी साधत सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. गावोगावी नारळ फोडून, देवदर्शन करून, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांतून प्रचाराची पहिली पायरी टाकण्यात आली. त्यामुळे सकाळपासूनच ग्रामीण भागात निवडणुकीची लगबग दिसून आली.

 

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला. अनेक ठिकाणी गावभेट दौरे, छोटेखानी सभा, चौकसभा, तर काही भागांत दुचाकी व पायी रॅली काढण्यात आल्या. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “यंदाची निवडणूक निर्णायक ठरणार” असा दावा प्रत्येक पक्षाकडून केला जात आहे.

प्रचाराच्या सुरुवातीलाच आरोप-प्रत्यारोपांची फैरी

प्रचारादरम्यान विकास हा मुख्य मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, वीज, शेती व रोजगार यासारख्या प्रश्नांवर उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्ताधारी पक्षांनी मागील कार्यकाळातील कामांचा पाढा वाचला, तर विरोधकांनी अपूर्ण विकास, दुर्लक्षित प्रश्न आणि प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवले. त्यामुळे प्रचाराच्या सुरुवातीलाच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत.

राजकीय हालचालींना वेग

काही गटांमध्ये अनुभवी उमेदवार विरुद्ध नवख्या चेहऱ्यांची लढत पाहायला मिळत असून, तरुणांना संधी देण्याचा मुद्दाही अनेक ठिकाणी मांडण्यात येत आहे. त्याचबरोबर अंतर्गत नाराजी, बंडखोरी आणि स्थानिक समीकरणे यांचाही प्रचारावर प्रभाव जाणवत आहे. प्रचाराचा शुभारंभ होताच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, सोशल मीडियासह प्रत्यक्ष मैदानातही प्रचाराची धग वाढणार आहे. अखेर मतदार कोणाच्या कामावर आणि शब्दांवर विश्वास ठेवतो, यावरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सत्तेचे गणित ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Web Title: Vigorous campaigning is underway by all parties for the pune zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Election News
  • pune news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू
1

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर
2

Pune Rain News : पुण्यातील रस्त्यांची अवकाळी पावसात झाली नदी; उपमहापौर परशुराम वाडेकर उतरले रस्त्यावर

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश
3

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…
4

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.