Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं प्रतिउत्तर, म्हणाले; त्यांनी आता…

वसंत मोरे यांनी काँग्रेसवर, विशेषतः काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर प्रशांत जगताप यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2026 | 03:30 PM
वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं प्रतिउत्तर, म्हणाले; त्यांनी आता...

वसंत मोरेंच्या आरोपांवर प्रशांत जगतापांचं प्रतिउत्तर, म्हणाले; त्यांनी आता...

Follow Us
Follow Us:
  • वसंत मोरेंचे काँग्रेसवर थेट आरोप
  • आरोपांवर प्रशांत जगतापांचं प्रतिउत्तर
  • पुण्यात नेमकं काय घडतंय?
पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली असली, तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवाय पक्षाचे काही प्रमुख उमेदवारही पराभूत झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांची आघाडी होती. मात्र, निकालानंतर आता दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षाचे निवडणूक प्रमुख वसंत मोरे हे प्रभाग क्रमांक ३८ मधून निवडणूक लढवत होते. मात्र, भाजपचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी त्यांचा सुमारे ११०० मतांनी पराभव केला. या पराभवानंतर वसंत मोरे यांनी काँग्रेसवर, विशेषतः काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर प्रशांत जगताप यांनी प्रतिउत्तर दिले असून, या मुद्द्यावरून शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर वसंत मोरे यांनी मतदानाच्या आकडेवारीबाबत संशय व्यक्त केला होता. मतदानानंतर दिलेली आकडेवारी आणि प्रत्यक्ष मतमोजणीवेळी जाहीर झालेल्या मतांमध्ये तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसवर थेट आरोप

सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रशांत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले. “प्रशांत जगताप यांनी भाजपशी हातमिळवणी करून माझा पराभव घडवून आणला,” असा दावा मोरे यांनी केला आहे. मोरे यांच्या म्हणण्यानुसार, “माझ्या प्रभागात काँग्रेसला एक जागा सोडलेली असताना देखील जगताप यांनी पाच काँग्रेस उमेदवार दिले. आघाडी असूनही असे का केले, याबाबत मी सातत्याने त्यांना आणि शहराध्यक्षांना सांगत होतो.”

हे सुद्धा वाचा : अजित पवारांना मोठा धक्का! बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर; मुंबईत होणार पक्षप्रवेश

वसंत मोरे यांना जगताप यांचे प्रत्युत्तर

काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “वसंत मोरे हे सोशल मीडियावर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले नेते आहेत. अशा नेत्याचा भाजपच्या नवख्या कार्यकर्त्याने पराभव केला. यावर त्यांनी आत्मचिंतन करायला हवे. मी, अरविंद शिंदे किंवा कॉंग्रेसने वसंत मोरे यांच्या विरोधात कोणताही उमेदवार दिलेला नाही, असा खुलासाही प्रशांत जगताप यांनी केला.

Web Title: Congress leader prashant jagtap has responded to vasant mores allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Congress
  • Prashant jagtap
  • pune news
  • Vasant more

संबंधित बातम्या

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
1

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
2

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा
3

‘दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या, नाहीतर मंत्र्यांना फिरू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारला इशारा

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला
4

गणेशम फेज २ सोसायटीत आग, दोन चिमुरड्यांची सुखरूप सुटका; मोठा अनर्थ टळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.