Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या परिसरात वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात चाकण व महाळुंगे वाहतूक पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 18, 2026 | 01:53 PM
बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

Follow Us
Follow Us:

चाकण : चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या परिसरात वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त चालकांविरोधात चाकण व महाळुंगे वाहतूक पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. पुणे-नाशिक महामार्ग, तळेगाव मार्ग, शिक्रापूर मार्ग यांसह एमआयडीसी परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर नाकाबंदी करून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

 

चाकण शहरातील प्रमुख चौक, मुख्य बाजारपेठा आणि प्रचंड वर्दळीच्या ठिकाणांवर वाहतूक पोलिसांकडून विशेष पाळत ठेवली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने पुढील कारणांसाठी गुन्हे नोंदवून दंड आकारण्यात येत आहे.

प्रमुख चौकांत विशेष तपासणी मोहीम

विनापरवाना वाहने चालविणे
‘नो पार्किंग’ क्षेत्रात बेशिस्तपणे वाहने उभी करणे
हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर टाळणे
वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे
वाहनांची वैध कागदपत्रे सोबत न बाळगणे
फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणे आणि सिग्नल तोडणे

दीड महिन्यात तब्बल १ कोटी ३४ लाखांचा दंड वसूल

महाळुंगे वाहतूक विभागाने १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत धडक कारवाई करत तब्बल ९,७७७ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेतून तब्बल १,३४,५९,५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहील, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. काही वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच त्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत समजही दिली जात आहे.

हे सुद्धा वाचा : चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

तळेगाव चौकात २० रिक्षांवर जप्तीची कारवाई

पुणे-नाशिक महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तळेगाव चौक परिसरात वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने अनधिकृतपणे उभ्या केलेल्या सुमारे २० रिक्षांवर चाकण वाहतूक विभागाने कारवाई केली. या सर्व रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, संबंधित चालकांवर विविध वाहतूक कलमांनुसार गुन्हे दाखल करून दंड आकारला जाणार असल्याचे चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी सांगितले. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तारामुळे चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे दुचाकी चालवताना हेल्मेट, चारचाकी चालवताना सीट बेल्ट, वाहनांची सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवणे आणि रस्त्यावर वाहने अस्ताव्यस्त न लावणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महाळुंगे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे व चाकणचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी यांनी केले आहे.

Web Title: The chakan police are taking action against motorists driving indisciplinedly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Chakan News
  • maharashtra
  • Traffic Police

संबंधित बातम्या

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
1

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
2

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
3

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
4

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.