Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुरक्षिततेसाठी वरंधा घाट ‘या’ तारखेपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी डुडी यांचा आदेश

महाड-भोर-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा दुवा असलेला वरंधा घाट ३० एप्रिलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2026 | 01:21 PM
सुरक्षिततेसाठी वरंधा घाट 'या' तारखेपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी डुडी यांचा आदेश

सुरक्षिततेसाठी वरंधा घाट 'या' तारखेपर्यंत बंद राहणार; जिल्हाधिकारी डुडी यांचा आदेश

Follow Us
Close
Follow Us:

भोर : महाड-भोर-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा दुवा असलेला वरंधा घाट ३० एप्रिलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटातील कॉंक्रिटीकरणाचे काम आणि पावसाळ्यापूर्वीची सुरक्षितता लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत.

वरंधा घाटातील २१ किलोमीटर अंतराच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर हिर्डोशी ते वरंधा (किमी ७०/९०० ते ९२/००३) दरम्यान रस्ता अत्यंत अरुंद आणि धोकादायक वळणांचा आहे. एका बाजूला नीरा-देवघर धरणाचे बॅकवॉटर आणि दुसऱ्या बाजूला उंच डोंगर असल्याने पर्यायी जागा उपलब्ध नाही. याशिवाय या मार्गावरील काही भाग हा वनविभागाच्या हद्दीतून आहे. त्याच्या मंजुरीसाठी वनविभागाचे नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी अर्ज दाखल केलेला आहे. येणारा पावसाळा लक्षात घेता पावसाळ्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून जेणेकरून पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कमी करता येईल.

याबाबत भोरचे उपविभागीय अधिकारी यांनी पोलिस, तहसीलदार आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी वरंधा घाटातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मार्चपासून ते 30 एप्रिलपर्यंत हा मार्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

काही गावांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध

घाट पूर्णपणे बंद असला तरी स्थानिक गावांतील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष तरतूद करण्यात आली आहे. धामणदेव, कारुंगण, हिर्डोशी, सोमजाई माळ, वारखंड, शिरगाव, उंबर्डेवाडी, शिळीम आदी गावांसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध केला असुन रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांना आपत्कालीन स्थितीत परवानगी दिली जाईल.

महाड-पुणे, महाड-कोल्हापूरसाठी पर्यायी मार्ग

महाडहून पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव – निजामपूर – ताम्हिणी घाट – मुळशी – पिरंगुट – पुणे कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा -पोलादपूर – महाबळेश्वर – वाई – सुरुर – सातारा – कराड-कोल्हापूर अथवा राजेवाडी फाटा – पोलादपूर – खेड – चिपळूण – पाटण – कराड – कोल्हापूर.

Web Title: The district collector has decided to completely close varandha ghat for the safety of citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Weather Update : उन्हाचा कडाका वाढत असतानाच पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज
1

Weather Update : उन्हाचा कडाका वाढत असतानाच पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज

Pune News : 31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
2

Pune News : 31 मार्चपूर्वी पीककर्ज भरल्यास शून्य टक्के व्याज; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पुणे ‘झेडपी’ ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमातही ‘प्रथम’ क्रमांकाने निवड
3

पुणे ‘झेडपी’ ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमातही ‘प्रथम’ क्रमांकाने निवड

SPPU Budget 2026 : पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; यंदाही 83 कोटींची तुटी, विद्यार्थ्यांना काय मिळाले?
4

SPPU Budget 2026 : पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; यंदाही 83 कोटींची तुटी, विद्यार्थ्यांना काय मिळाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.