Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे ‘झेडपी’ ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमातही ‘प्रथम’ क्रमांकाने निवड

मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषदेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2026 | 12:19 PM
पुणे 'झेडपी' ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमातही ‘प्रथम’ क्रमांकाने निवड

पुणे 'झेडपी' ई-गव्हर्नन्समध्ये राज्यात अव्वल; सेवाकर्मी कार्यक्रमातही ‘प्रथम’ क्रमांकाने निवड

Follow Us
Follow Us:

पुणे : मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात पुणे जिल्हा परिषदेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०० पैकी तब्बल १९६.२५ गुण मिळवत जिल्हा परिषदेने अव्वल स्थान मिळवले. सेवाकर्मी कार्यक्रमातही जिल्हा परिषदेची ‘प्रथम’ क्रमांकाने निवड झाली आहे. मुंबईतील सह्याद्री सभागृहात झालेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

राज्यातील शासकीय कार्यालयांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन सात निकषांवर करण्यात आले होते. संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता व ब्लॉकचेनचा वापर, तसेच भौगोलिक माहिती प्रणाली या घटकांमध्ये पुणे जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.

गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेनं डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टिम (आय डब्लयूएमएस), ‘स्पंदन’, ई-लॉटरी, सिस्टम ऑफ पेन्शन इलस्ट्रेशन (एसओपीआय) आणि क्यूआर कोड आधारित करसंकलन प्रणाली यामुळे प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक झाले आहे.

सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ द्विभाषिक व सुरक्षित असून ‘आपले सरकार’ प्रणालीत शंभर टक्के सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. ई-ऑफिसमुळे कागदविरहित प्रशासनाला गती मिळाली असून हजारो नस्त्या जलद निकाली काढल्या जात आहेत. स्मार्ट डॅशबोर्डमुळे डेटा-आधारित निर्णय प्रक्रियेला चालना मिळाली आहे. ‘पुणे झेडपी संवाद’ या व्हॉट्सअॅप एआय चॅटबॉटद्वारे नागरिकांना २४x७ सेवा उपलब्ध होत आहेत. दरम्यान, सेवाकर्मी कार्यक्रमात ‘विशेष प्रशंसनीय’ म्हणून झालेली निवड ही सेवा गुणवत्ता, नागरिक समाधान आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेची पावती असल्याचे मानले जात आहे. या यशाचे श्रेय देताना पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा : Pune ZP चे 300 कोटींचे बजेट मंजूर; ९ कोटींची मर्यादित वाढ, नव्या योजनांवर देण्यात आला भर

डिजिटल प्रशासन ही काळाची गरज

डिजिटल प्रशासन ही काळाची गरज असून नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी जि.प. कटिबद्ध राहील,” असे पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी या यशाला संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान असल्याचे सांगितले, तर उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनीही सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा विश्वास व्यक्त केला.

Web Title: The pune zilla parishad has secured the first rank in the state in e governance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:19 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.