Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?

पुणे जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची निवड जाहीर होऊनही सत्तेचा खरा खेळ अजून रंगात आलेलाच नाही. अध्यक्षपदाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2026 | 04:59 PM
अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?

अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?

Follow Us
Follow Us:
  • अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच
  • जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?
  • सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण
पुणे/आकाश ढुमेपाटील : पुणे जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची निवड जाहीर होऊनही सत्तेचा खरा खेळ अजून रंगात आलेलाच नाही. दौंडचे वीरधवल जगदाळे अध्यक्षपदी आणि विवेक वळसे पाटील उपाध्यक्षपदी विराजमान झाले; मात्र ‘सव्वा वर्षे की अडीच वर्षे’ हा कार्यकाळाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

या अनिश्चिततेमुळे जिल्हा परिषदेत पुढील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होत आहे. विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना अनेक इच्छुकांनी अचानक ‘ब्रेक’ लावल्याचे चित्र आहे. सभापतीपद स्वीकारल्यास अध्यक्षपदाची संधी हुकू शकते, या भीतीनेच दावेदार मागे सरकत असल्याची चर्चा रंगली आहे. अडीच वर्षांचा फॉर्म्युला लागू झाल्यास अध्यक्षपदावर ‘एकच चेहरा’ कायम राहणार, तर सव्वा वर्षांच्या फॉर्म्युल्यात दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता निर्माण होणार, याच राजकीय गणितांवरून सध्या अंतर्गत रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळेच फॉर्म्युला जाहीर करण्यास विलंब होत असल्याचा आरोपही दबक्या आवाजात होत आहे. अध्यक्षपदासाठी भोरचे विक्रम खुटवड, मुळशीचे शांताराम इंगवले, दौंडचे तुषार आप्पा थोरात, बारामतीचे करण खलाटे आदींची नावे चर्चेत होती. मात्र, अंतिम निर्णयानंतरही कार्यकाळाबाबतची अस्पष्टता कायम असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

दरम्यान, मावळ–मुळशी भागातून सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या सत्कारानंतर समित्यांच्या नियुक्त्या जाहीर होणार असल्याचे सांगितले जात असले, तरी फॉर्म्युला स्पष्ट होईपर्यंत जिल्हा परिषदेत राजकीय अस्थिरता कायम राहणार, हे मात्र निश्चित.

हे सुद्धा वाचा : महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? काँग्रेसचा सवाल

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एका जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. दरम्यान, विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अध्यक्षपदी कुणाला संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. महत्त्वाची बाब म्हणजे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील उमेदवारांनीही घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे या पक्षातील नेत्यालाही जिल्हा परिषदेवर संधी मिळणार का, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर दौंडचे वीरधवल जगदाळे अध्यक्षपदी आणि विवेक वळसे पाटील उपाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.

Web Title: The formula for the post of pune zilla parishad president has not been announced yet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.