Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेडपीची गोठवलेली बँक खाती अखेर पूर्ववत; पेन्शनधारकांचे थकीत वेतन तातडीने वितरित होणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या तब्बल १,०८४ कोटी रुपयांच्या थकीत रकमेप्रकरणी गोठवण्यात आलेली पुणे जिल्हा परिषदेची बँक खाती अखेर पूर्ववत केली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 24, 2026 | 12:29 PM
झेडपीची गोठवलेली बँक खाती अखेर पूर्ववत; पेन्शनधारकांचे थकीत वेतन तातडीने वितरित होणार

झेडपीची गोठवलेली बँक खाती अखेर पूर्ववत; पेन्शनधारकांचे थकीत वेतन तातडीने वितरित होणार

Follow Us
Follow Us:

पुणे : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या तब्बल १,०८४ कोटी रुपयांच्या थकीत रकमेप्रकरणी गोठवण्यात आलेली पुणे जिल्हा परिषदेची बँक खाती अखेर पूर्ववत केली आहेत. प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने ७ मे रोजी जारी केलेला बँक खाती गोठवण्याचा आदेश २२ मे रोजी अधिकृतपणे मागे घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत. रखडलेले निवृत्ती वेतनही संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे.

 

या प्रकरणाची सुरुवात जिल्हा परिषदेतील ९,०४७ मानधनावरील, कंत्राटी व अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत ‘सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स’ या संघटनेने ईपीएफओकडे केलेल्या तक्रारीतून झाली होती. सप्टेंबर २०२४ पासून सुरू असलेल्या चौकशीनंतर ईपीएफओने ऐतिहासिक निर्णय देत ऑक्टोबर १९८६ ते मार्च २०२४ या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांसाठी जिल्हा परिषद हीच ‘नियोक्ता संस्था’ असल्याचे स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी

यानंतर ईपीएफओने पुणे जिल्हा परिषदेला २ मार्च २०२६ रोजी १०८४ कोटी रुपयांची थकीत ईपीएफ रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते. या रकमेतील मोठा हिस्सा अंगणवाडी कर्मचारी, कंत्राटी मदतनीस, अर्धवेळ परिचारक आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा असून, त्यात व्याजाचाही समावेश आहे.

पेन्शन रखडल्याने नाराजी व्यक्त

मात्र, दिलेल्या मुदतीत ही रक्कम जमा न झाल्याने ईपीएफओच्या प्रवर्तन अधिकाऱ्यांनी ७ मे रोजी पुणे जिल्हा परिषदेची पाच बँक खाती गोठवण्याची धडक कारवाई केली होती. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. विशेषतः निवृत्ती वेतनधारकांचे पेन्शन रखडल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती.

हे सुद्धा वाचा : महायुतीत वर्चस्ववादासाठी रस्सीखेच; भाजपा, राष्ट्रवादीच्या इच्छुकांकडून मतदारसंघ मिळवण्यासाठी हालचाली

थकीत वेतन तातडीने वितरित होणार

बँक व्यवहार सुरू झाल्यानंतर पेन्शनधारकांचे थकीत वेतन तातडीने वितरित करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे जिल्हा परिषदांमधील कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या प्रश्नाकडे राज्यभराचे लक्ष वेधले गेले आहे. तसेच, अंगणवाडी व इतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ईपीएफ निधीसाठीचा मार्ग आता अधिक स्पष्ट झाल्याची भावना कामगार संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: The frozen bank accounts of pune zilla parishad have finally been restored

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 12:29 PM

Topics:  

  • bank accounts
  • pune news
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
1

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान
2

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर
3

पालखी सोहळ्यासाठी नीरा सज्ज; वाहतूक, पार्किंग व सुरक्षा नियोजनावर जेजुरी पोलिसांचा भर

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…
4

भरलं रे भरलं! पुण्यावर वरुणराजाची अथांग कृपा! Khadakwasla धरणाच्या कालव्यातून थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.