Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडगाव शेरीमध्ये दूषित पाणीपुरवठा, भामा- आसखेडमधील पाण्याला दुर्गंधी; रुग्णांचे प्रमाण वाढले

मनपाच्या प्रभाग क्रमांक दोनसह वडगाव शेरी मतदारसंघात २० मे पासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भामा- आसखेड प्रकल्पातून होणार्‍या या पाणीपुरवठ्याला दुर्गंधी येत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 26, 2026 | 05:57 PM
वडगाव शेरीमध्ये दूषित पाणीपुरवठा, भामा- आसखेडमधील पाण्याला दुर्गंधी; रुग्णांचे प्रमाण वाढले

वडगाव शेरीमध्ये दूषित पाणीपुरवठा, भामा- आसखेडमधील पाण्याला दुर्गंधी; रुग्णांचे प्रमाण वाढले

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे मनपाच्या प्रभाग क्रमांक दोनसह वडगाव शेरी मतदारसंघात २० मे पासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भामा- आसखेड प्रकल्पातून होणार्‍या या पाणीपुरवठ्याला दुर्गंधी येत असून, अनेक भागांमध्ये जुलाब, उलट्या आदी आजारांचे रुग्ण वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या परिसरातील पाच लाख नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

प्रभाग दोनमधील नागपूर चाळ, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, त्रिदलनगर, टिंगरेनगर, चव्हाण चाळ, कस्तुरबानगर, जेल रोड परिसरासह वडगाव शेरी मतदारसंघात ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रकरणी नगरसेविका नंदिनी धेंडे आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, यांच्यासह प्रभाग दोन व चार मधील नगरसेवकांच्या वतीने हे प्राशन समोर आणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करून सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. नागरिकांकडून वाढत्या तक्रारी लक्षात घेता त्यांनी पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप, लष्कर झोन प्रमुख केळकर तसेच बंडगार्डन विभाग प्रमुख ऐकनाथ गाडेकर यांच्याशी संपर्क साधून परिसरातील परिस्थितीची माहिती दिली.

याबरोबरच भामा आसखेड जलशुद्धीकरण प्रकल्पाचे व्यवस्थापक रामदास तारु यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. यावेळी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ही समस्या उद्भवली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नंदिनी धेंडे, सुहास टिंगरे, शितल सावंत, रवि टिंगरे आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारात पाणीपुरवठा विभाग आणि विद्युत विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही अधिकारी भामा आसखेड जलशुद्धीकरण प्रकल्पात तांत्रिक अडचण असल्याचे सांगत आहेत, तर काही अधिकार्‍यांकडून कोणतीही समस्या नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : ” हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार…” पुणे जमावबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची टीका धेंडे यांनी केली. दूषित पाणीपुरवठा तातडीने बंद करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नंदिनी धेंडे आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी तसेच प्रभाग दोनचे चारही नगरसेवकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापलिका प्रशासनाला दिला आहे.

Web Title: The health of the citizens is being affected due to contaminated water supply in vadgaon sheri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • Pune mahapalika
  • pune news
  • water issues

संबंधित बातम्या

महिंद्राची पुण्यात मोठी झेप! PPS मोटर्ससोबत कॅम्प परिसरात सुरू केला अत्याधुनिक टचपॉइंट
1

महिंद्राची पुण्यात मोठी झेप! PPS मोटर्ससोबत कॅम्प परिसरात सुरू केला अत्याधुनिक टचपॉइंट

पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या; शहराच्या बहुतेक भागात होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा
2

पुणेकरांनो, पाणी उकळूनच प्या; शहराच्या बहुतेक भागात होतोय गढूळ पाण्याचा पुरवठा

PMRDA ची मोई येथे विक्रमी कारवाई; 680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त, 35 हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त
3

PMRDA ची मोई येथे विक्रमी कारवाई; 680 अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त, 35 हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त

Maharashtra Weather: हाहाकार, भीषण संकट! मान्सून पोहोचला; पण पाऊसच नाही, ७५ टक्के जिल्ह्यांत…
4

Maharashtra Weather: हाहाकार, भीषण संकट! मान्सून पोहोचला; पण पाऊसच नाही, ७५ टक्के जिल्ह्यांत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.