Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेरिटेज वॉकमुळे दुर्मीळ इतिहास उजेडात; उपक्रमाला नागरिक, पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाला नागरिक आणि पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे लपलेली वारसास्थळे नव्याने समोर येत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2026 | 12:41 PM
हेरिटेज वॉकमुळे दुर्मीळ इतिहास उजेडात; उपक्रमाला नागरिक, पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हेरिटेज वॉकमुळे दुर्मीळ इतिहास उजेडात; उपक्रमाला नागरिक, पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : पुणे शहरात सध्या सुरू असलेल्या हेरिटेज वॉक उपक्रमाला नागरिक आणि पर्यटकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे शहरातील केवळ प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळेच नव्हे, तर अनेक दुर्लक्षित आणि लपलेली वारसास्थळे नव्याने समोर येत आहेत. परिणामी, पुणेकरांमध्ये आपल्या इतिहासाबद्दल नव्याने जागरूकता निर्माण होत आहे. हेरिटेज वॉकमध्ये शनिवार वाडा, लाल महाल आणि कसबा गणपती मंदिर यांसारख्या प्रमुख स्थळांसोबतच कमी परिचित भागांचा समावेश केला जात आहे.

 

विशेषतः सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर, जुन्या वाड्यांतील लाकडी नक्षीकाम, पेशवाईकालीन गल्ली-बोळ, तसेच पारंपरिक बाजारपेठा या ठिकाणांचा नव्याने शोध लागला आहे. काही वॉकमध्ये गणेशोत्सवाशी संबंधित ९ ते १० ऐतिहासिक मंदिरांचा समावेश करून त्यांच्या स्थापनेमागील सामाजिक व स्वातंत्र्यलढ्याशी निगडित इतिहास उलगडला जात आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘अनुभवाधारित शिक्षण’, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुस्तकातील इतिहास प्रत्यक्ष स्थळांवर पाहता येत असल्याने त्यांचा अभ्यास अधिक सखोल होत आहे.

पुणे शहर आणि परिसरात अनेक महत्त्वाच्या संस्था, मंदिरे व ऐतिहासिक वास्तू आहेत, ज्यांच्याबद्दल आजही अनेकांना पुरेशी माहिती नाही. ‘हेरिटेज वॉक’च्या माध्यमातून या सर्व ठिकाणांचा सविस्तर परिचय होतो. या उपक्रमामुळे आपल्याला ऐतिहासिक दस्तऐवज, आपली गौरवशाली संस्कृती आणि समृद्ध इतिहास जवळून अनुभवण्याची सुवर्णसंधी मिळते -जगदीश बामणे, विद्यार्थी.

मार्गदर्शकांकडून कथाकथन, किस्से आणि ऐतिहासिक संदर्भ सांगितले जातात. काही ठिकाणी फोटो वॉक, नाट्यरूपांतरण आणि सांस्कृतिक सादरीकरणेही आयोजित केली जातात, ज्यामुळे सहभाग अधिक आकर्षक बनतो. पर्यटनाच्या दृष्टीनेही हेरिटेज वॉक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. देश-विदेशातील पर्यटकांना पुण्याचा समृद्ध वारसा जवळून अनुभवता येत असल्याने शहराच्या पर्यटनाला चालना मिळत आहे. स्थानिक मार्गदर्शक, लहान व्यावसायिक, हस्तकला विक्रेते आणि कॅफे यांनाही या उपक्रमाचा आर्थिक फायदा होत आहे. परिणामी, ‘हेरिटेज टुरिझम’ या संकल्पनेला शहरात बळ मिळत आहे.

हेरिटेज वॉक किंवा जे काही वारसा भटकंती सुरू आहे त्यातून मुलांना ऐतिहासिक जागा अनुभवायला मिळणे. इतिहास जेवढा पुस्तकातून अनुभवला जातो त्यापेक्षा त्या ऐतिहासिक जागांना भेट देणे जास्त गरजेचे असते. वारसा पाहणे ही केवळ एक मनोरंजनाची गोष्ट नसून त्यातून एक जनजागृती होते. त्यामधून तो वारसा जतन आणि संवर्धन करण्याची नवी प्रेरणा मिळते आणि हा वारसा जतन केल्यानंतर मूळ विह तरुणांपर्यंत तो वारसा पोहचला तर पर्यटन वाढेल आणि त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता देखील आहे. -केतन पुरी, इतिहास अभ्यासक

अनेक ऐतिहासिक वास्तूंची जीर्ण अवस्था

तथापि, या वॉकमधून काही गंभीर समस्या देखील पुढे आल्या आहेत. अनेक ऐतिहासिक वास्तूंची जीर्ण अवस्था, पुरेशा देखभालीचा अभाव, स्वच्छतेचे प्रश्न आणि वाढते शहरीकरण यामुळे वारसास्थळांवर धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी रस्ते रुंदीकरण आणि विकासकामांमुळे जुन्या वास्तू स्थलांतरित करण्याची वेळ येत आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रशासनाने संवर्धनासाठी ठोस धोरण आखून नागरिकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. फर्ग्युसन कॉलेज आणि अनेक वर्ष झालेल्या कॉलेजमधे सुद्धा हेरिटेज वॉक आयोजित केले जातात. एकूणच, हेरिटेज वॉक हा केवळ पर्यटनाचा भाग नसून, तो पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा शोध घेणारा आणि ती जपण्याची जाणीव करून देणारा प्रभावी उपक्रम ठरत आहे. नव्याने समोर येणारी वारसास्थळे आणि वाढता प्रतिसाद पाहता, भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याला एक सांस्कृतिक परंपरा आहे त्यामुळे पुणे आणि पुण्याच्या परिसरात अनेक कला, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था, उदयाला आलेल्या आहेत. या सर्व संस्था पाहण्यासाठी तसेच पुण्याच्या परिसरामध्ये आणि प्रत्यक्ष पुण्यामध्ये 100 वर्ष होऊन अधिक काळ असलेली फर्ग्युसन महाविद्यालय एस पी कॉलेज डेक्कन कॉलेज यासारखी महाविद्यालय आहेत. पुणे विद्यापीठ आहे तर या आणि अशाच महत्त्वाच्या संस्थांची माहिती करून घेणे ही आपली गरज आहे आणि त्यामुळे पुण्यातल्या हेरिटेज वॉक मधे पुण्याचा सांस्कृतिक वारसा समजून घेण्याची एक सुवर्णसंधी आहे. -डॉ. रूपाली शिंदे (सांस्कृतिक विभाग प्रमुख, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे)

Web Title: The heritage walk initiative is receiving an enthusiastic response from citizens and tourists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • College
  • pune city
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
1

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी
2

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव
3

Chess: पुण्यात रंगला बुद्धिबळाचा महासंग्राम! खुल्या गटात कोण जिंकले? विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी
4

पुण्यात आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठवचा थरार; ऋषिकेश बेळमकर ठरला ‘नंदू मराठे श्री’ चा मानकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.