Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती

मावळ तालुक्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध तिकोना किल्ला अर्थात वितंडगड येथे येणाऱ्या पर्यटकांना गडाचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू तसेच परिसराची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 06, 2026 | 01:18 PM
तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती

तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ/सतिश गाडे : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक व प्रसिद्ध तिकोना किल्ला अर्थात वितंडगड येथे येणाऱ्या पर्यटकांना गडाचा इतिहास, ऐतिहासिक वास्तू तसेच परिसराची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तिकोना गडाचा इतिहास ऑडिओच्या माध्यमातून ऐकता येणार असून, त्यामुळे गडभ्रमंतीचा अनुभव अधिक माहितीपूर्ण होणार आहे. तिकोना गडाच्या विविध ठिकाणांची तसेच गडाच्या इतिहासाची माहिती पर्यटकांना देण्यासाठी यापूर्वी उपलब्ध असलेल्या पारंपरिक माहितीबरोबरच आता ऑनलाइन ऑडिओ बुकची निर्मिती करण्यात आली आहे. गडावर लावण्यात आलेला क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर पर्यटकांना संबंधित ऐतिहासिक माहिती ऐकता येणार आहे.

 

तिकोना किल्ल्याला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक व शिवप्रेमी भेट देतात. अनेक पर्यटकांना गडाच्या वास्तूंचे महत्त्व, त्यामागील इतिहास आणि गडाशी संबंधित विविध घटनांची माहिती प्रत्यक्ष पाहताना मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन क्यूआर कोडच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

२४ तास उपलब्ध राहणार माहिती

या उपक्रमामुळे पर्यटकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार तिकोना गडाचा इतिहास ऐकता येणार आहे. २४ तास ही माहिती उपलब्ध राहणार असल्याने गडावर येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याही वेळी क्यूआर कोड स्कॅन करून ऐतिहासिक माहिती मिळवता येईल. विशेष म्हणजे, गडावरील विविध ठिकाणी संबंधित माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक डिजिटल माध्यमाचा उपयोग करण्यात आला आहे.

एआय तंत्रज्ञानाची जोड

या ऑनलाइन ऑडिओ बुकच्या निर्मितीसाठी एआय फाउंडेशन आणि नेटक्रिएटर टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तिकोना गडाचा इतिहास आणि उपलब्ध माहिती अधिक प्रभावी पद्धतीने पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यात तिकोना गडाचा इतिहास तसेच विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. त्यामुळे गडभ्रमंतीसोबतच पर्यटकांना इतिहास समजून घेण्याची आणि ऐतिहासिक वारशाची जाणीव निर्माण होण्याची संधी मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा : टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

या उपक्रमाच्या माध्यमातून तिकोना गडाच्या इतिहासाचे जतन आणि प्रसार करण्याबरोबरच तरुण पिढीला गड-किल्ल्यांच्या इतिहासाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. डिजिटल माध्यमातून माहिती उपलब्ध होत असल्याने राज्यातील तसेच परराज्यातील पर्यटकांनाही याचा लाभ होण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमावेळी तनीर इनामदार, प्रिया जोशी, सुहास गाडेकर, विनोद गोरे, अभिजित पाटील, नितीन भगवत, पियुष कुंभार, संतोष सावळे, किरण चिमटे आदी उपस्थित होते.

Web Title: The history of tikona fort can be heard through audio nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • fort
  • maharashtra
  • maval news

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी
1

Pratap Sarnaik: ‘स्कॉच’ पुरस्कारानंतर मंत्री सरनाईक विरुद्ध महापालिका; SCWC प्रकल्पाच्या श्रेयावरून वादाची ठिणगी

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
2

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
3

Leopard CCTV Video: बिबट्याची दहशत सुरूच; देवरुखच्या साडवली परिसरातील थरारक दृश्य CCTV मध्ये, तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप
4

Mira Bhayandar News: फेरीवाला ओळखपत्र वाटपाचा अधिकार ठेकेदाराला कोणी दिला? समितीला अंधारात ठेवून कार्डांचे वाटप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.